करवीर तालुका
जिथे कोल्हापूर हे शहर वसलेलं आहे तो तालुका म्हणजे करवीर.करवीर क्षेत्र म्हणजे अनेक तीर्थांचे स्थान परंतु आज अनेक तीर्थे नामशेष झाली आहेत.करवीर या तालुक्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये श्री महालक्ष्मी(अंबाबाई) मंदीर,रंकाळा,शालेनी पँलेस, कुस्त्यांचे खासबाग मैदान,भवानी मंडप, जुना राजवाडा,राजर्षी छ.शाहु महारांजाच जन्मस्थळ अशा अनेक ऐतिहासिक वास्तू,मंदीरे आहेत.कोल्हापूरची जिवनदायनी पंचगंगा याच तालुका मधून वाहते.करवीर या तालुकामध्ये चार दिशेला चार रक्षक देवता आहेत त्यामध्ये श्री कात्यायनी श्री जोतिबा श्री सिद्ध बटुकेश्वर व श्री त्रंबोली देवी तसेच अंतरगृही 4 विष्णूची मंदिर आहेत.करवीर तालुक्यामध्ये अनेक शिवालय आहेत.कपिलेश्वर हे करवीर च ग्रावदैवत आहे.रूद्रेश्वर,कोटेश्वर,लक्षेश्वर,रंकेश्वर,उत्तरेश्वर अशी अनेक शिवालय आहेत.करवीर तालुकामध्ये 121 गावांचा समावेश आहे