चित्रतपस्वी भालजी पेंढारकर कला दालन

भालचंद्र् गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी कोल्हापुरात झाला. सदगुरु सदानंद महाराजांचा बालवयातच त्यांना सहवास लाभला.स्वातंत्र्य चळवळीत बाबाराव सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीरांच्या कार्यात सहभागी होत असतानाच हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छ्त्रपती शिवाजी महाराज व युगंधर भगवान श्रीकृष्ण ही त्याची आराध्य दैवते बनली.नाट्यलेखन करीत असतानाच मुकपटांच्या टायटल्स लिहिण्याचे काम केले आणि पुढे स्वतंत्र चित्रपट निर्मितीस सुरुवात केली. देव, देश आणि धर्म जीवनाची त्रिसुत्री घेऊन वयाच्या ९६ व्या वर्षापर्यत त्यांनी अखंडपणे चित्रपट निर्मिती केली.दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद गीते यातून मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य केले. विशेषतः ऐतिहासिक चित्रपटाव्दारे स्वातंत्र्यपुर्व काळात महाराष्ट्राची अस्मिता व राष्ट्र्भक्ती चित्रपट माध्यामातुन समाजात रुजवली.भारताला स्वातंत्र्य मिळाले (१९४७). गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. जय भवानी (१९४७ ), शिलंगणाचे सोने (१९४९), छत्रपती शिवाजी (१९५२), महाराणी येसूबाई (१९५४), पावनखिंड (१९५६), नायकिणीचा सज्जा (१९५७), मोहित्यांची मंजुळा (१९६३), थोरातांची कमळा (१९६३), मराठा तितुका मेळवावा (१९६४), बालशिवाजी आणि गनिमी कावा (१९८१) अशी शिवचरित्रावर आधारित चित्रपटांची निर्मिती जयप्रभा स्टुडिओत सुरू राहिली. त्यांचे कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानीत केले. असे हे थोर व्यक्तिमत्व दि. २६ नोव्हेंबर १९९४ रोजी काळाच्या पडध्याआड अंतर्धान पावले.

काय पाहाल

  • स्व. बाबा तथा भालजी पेंढारकर यांचा जीवनपट दर्शविणारी छायाचित्रे.
  • स्व भालजी पेंढारकर यांच्या हस्ताक्षरातील लेखन, पत्रे, पटकथा, संवाद, गीते.
  • चित्रपटातील दॄश्यचित्रे, बुकलेट्स, शो कार्डस, पोस्टर्स, ध्वनीमुद्रीका इत्यादी.
  • त्यांच्या वापरातील कपडे, वस्तु, फर्निचर इत्यादी.
  • जयप्रभा स्टुडिओतील त्यांच्या कार्यालयीन खोलीची छायाचित्रे, स्टुडिओ छायाचित्रे.
  • ऐतिहासिक चित्रपटातील वेश, आभुषणे, शस्त्रे.
  • स्व भालजी पेंढारकरांच्या समकालीनांच्या सहवासातील व्यक्तींची, त्यांच्या समवेत तसेच कौटुंबिक छायाचित्रे.
  • स्व भालजी पेंढारकरांच्या चित्रफिती, ध्वनीफिती.
  • स्व भालजी पेंढारकरांच्या मुलाखती, कात्रणे, चित्रसमीक्षा, त्यांचे विचार फलक.
  • त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्यदर्शक स्थळांची, कार्याची छायाचित्रे माहिती.

कसे जाल ?

कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण ६ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

काही महत्वाच्या गोष्टी

संग्रहालयाची वेळ
सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00
( संग्रहालयात फोटो घेण्याची परवानगी नाही )
संग्रहालय रविवारी बंद राहते.
स्व. बाबा तथा भालजी पेंढारकर याच्या विषयी अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top