टाऊन हॉल संग्रहालयाची इमारत हि वास्तूकलेचा एक उत्तम नमुना आहे.१८७२ ते १८७६ च्या दरम्यान हि वास्तू बांधण्यात आली.सदरची हि इमारत गोथेक या पद्धतीने बांधली आहे.टाऊन हॉल चे प्रवेद्वारात दोन दगडी हत्ती व मोठी तोफ आहे.प्रवेशद्वाराचा दरवाजा हा लाकडी आहे.प्रवेशद्वार नंतर भव्य असा सभागृह शोभून दिसतो.सभागृहाच्या दोनी बाजूला दोन खोल्या आहेत.सभागृहाच्या वरच्या बाजूस गच्ची असून साधारण ५०० माणसे बसतील एवढी बैठक व्यवस्था आहे.टाऊन हॉलच्या सर्व बाजूला बाग असून येथे दुर्मिळ वनस्पती आहेत.टाऊन हॉल च्या डाव्या बाजूस श्री.कुकुटेश्वर महादेव मंदिर आहे व समोर छत्रपती शिवाजी महाराजांची संगमरवरी सुबक मूर्ती आहे.टाऊन हॉल समोर भव्य कारंजा असून पाण्यामध्ये सुंदर कमळ आहेत.
काय पाहाल
ब्रह्मपूरी येथे उत्खननात सापडलेल्या पुरातन मूर्ती,गाजलेल्या चित्रकारांची भव्य भित्ती चित्रे, कलात्मक वस्तू, प्राचीन नाणी, भरतकामाच्या वस्तू, पंखे, कपडे, पुतळे,चंदनाच्या मूर्ती, तलवारी, भाले, बंदुका, शिरस्त्राण व पिस्तूली इ. आकर्षक रित्या मांडून ठेवलेल्या वस्तू इथे पाहायला सापडतात.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण २.५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
काही महत्वाच्या गोष्टी
संग्रहालयाची वेळ
सकाळी 10.30 ते दुपारी 1.00
दुपारी 1.30 ते सायंकाळी 5.00
प्रवेश शुल्क - प्रौढांसाठी 10 ₹ आणी मुलांसाठी 5 ₹
( संग्रहालयात फोटो घेण्याची परवानगी नाही )
संग्रहालय सोमवारी बंद राहते.