श्री भैरवनाथ मंदिर,सैनिक गिरगाव

गिरगाव हे कोल्हापूर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. पाचगाव या  गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर गिरगाव आहे. मुख्य रस्त्यापासून डाव्या बाजूला आपल्याला गावाची प्रवेशद्वाराची कमान दिसते. गावाचे ग्रामदैवत हे श्री भैरवनाथ आहेत. या गावाला सैनिक गिरगाव असेही म्हणतात. कमानी पासून अवघ्या पाच मिनिटांमध्येच आपल्याला मंदिर दिसते. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर अशी चाफ्याची झाडे आहेत.चैत्र महिन्यामध्ये मंदिराचा परिसर खूप सार्‍या फुलांनी सजुन जातो.

तालुका - करवीर

..................................................

मार्ग - कोल्हापूर - पाचगाव - गिरगाव

..................................................

गावाचे नाव - गिरगाव

..................................................

योग्य काळ - वर्षभर

..................................................

मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस आपल्याला एक स्मारक दिसून येते. 1857 च्या बंडामध्ये शहिद क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे यांनी खुप योगदान दिले त्याबद्दल गिरगाव ग्रामपंचायत च्या वतीने 2009 साली हे स्मारक बांधण्यात आले आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताना खूप साऱ्या घंटा आपल्याला दिसतात.या मंदिराचा मुख्य गाभारा न हलवता जीर्णोद्धार केला गेला आहे. गाभाऱ्यामध्ये श्री भैरवनाथ व श्री जोगेश्वरी देवीचा तांदळा आहे. यात तांदळ्या वर मुखवट्याची सुंदर अशी पूजा बांधण्यात येते. डाव्या बाजूस श्री भैरवनाथाची मूर्ती आहे व उजव्या बाजूस श्री जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे.व दोन्ही मूर्तीच्या खाली आपल्याला श्रीं ची उत्सव मूर्ती दिसून येते. येथील एक वैशिष्ट्य म्हणजे  करवीर ची दक्षिण द्वारदेवता आई कात्यायानी देवी ही भैरवनाथाची बहिण आहे. दरवर्षी येथुन नवरात्र उत्सवात श्री कात्यायनी देविस साडी अर्पण केली जाते.असे तेथील पुजाऱ्यांनी सांगितले. भैरवनाथ मंदिराच्या समोर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे.

वेबसाईट बद्दलचा अभिप्राय नक्कीच नोंदवा

साधारण एक ते दीड फूट उंचीची श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आहे.व शेजारी देवळामध्ये एक फुटी श्री हनुमानाची सुंदर मुर्ती आहे.या या देवळामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हनुमंताच्या शेजारी श्री महादेवाची मूर्ती पण आहे परंतु येथे नंदी आपल्याला दिसून येत नाही.मुख्य मंदिराच्या समोर दिपमाळ दिसुन येते. मुख्य मंदिरापासून थोड्याच अंतरावर पुरातन असे महादेवाचे एक मंदिर आहे. मंदिरामध्ये तिरक्या नजरेने पाहत असलेली नंदीची सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या आवारामध्ये खूप सार्‍या वीरगळी आहेत. शेजारी गजेंद्र लक्ष्मी देवीची मूर्ती पण आहे. मंदिराच्या चारी बाजूला ही पूर्वी तटबंदी होती.1857 च्या बंडा मध्ये क्रांतिकारकांची फौज येथे तैनात आली होती. मंदिराच्या मागील बाजूस आता या तटबंदीचे अवशेष आपल्याला पहायला मिळतात.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top