शिंगणापूर गावातील श्री विशालेश्वर व विशालतीर्थ

कोल्हापूर पासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर विशालतीर्थ आहे.पंचगंगा नदीच्या घाटा शेजारीच विशालासुराचे मंदिर आहे व शेजारी श्री नरसिंह व हटकेश्वराचे स्थान आहे.हटकेश्वराचे स्थान हे गुप्त आहे.ही मंदिरे पाण्यामध्ये आहेत. नदीतील पाणी पात्रामध्ये गेल्यानंतर ही मंदिरे आपल्याला पाहता येतील.विशालतीर्थाचे महात्म्य असे कोल्हासुर राक्षसाचा पुत्र विशाल हा महाबलाढ्य होता,विशालासुराबरोबर युद्ध करण्यासाठी महाविष्णू सह सर्व देवांनी युद्ध करण्यास सुरवात केली.महाविष्णूनी विशालासुराचा वध केला.विशालासूराने असे वरदान मागितले की माझ्या नावाने आपन माझे लिंग स्थापन करावे,येथील स्नानाने व पिंडदानाने पितरांना मुक्ती मिळेल.विशालतीर्थावर पौष महिण्यात अमावस्येला यात्रा असते.मोठ्या प्रमानात इथे भाविक दाखल होतात.येथील घाट परिसर सुंदर आहे.घाटापासुन काहीच अतंरावर शाकंभरी देवी चे स्थान आहे.

विशालतिर्थाचे महात्म्य

अगस्तीमुनी माता लोपामुद्रा ला विशालतिर्थाचे महात्म्य सांगत आहेत पूर्वी कोल्हासूर राक्षसाचा विशाल नावाचा महाबलाढ्य पुत्र होऊन गेला.त्याने इंद्रादी सर्व देवाना युद्धात जिंकले तेव्हा महाविष्णुसह सर्व देवानी विशाल दैत्याबरोबर युद्ध करण्यास सुरुवात केली.त्यात विष्णूने विशाल दैत्याच्या छातीवर मुष्टीप्रहार केले.सर्व देव त्याचे अंगावर नाचू लागले.दैत्य हैराण झाले. तेव्हा देव म्हणाले, ‘आमच्या पदस्पर्शाने तू धन्य झाला आहेस तरी इच्छित वर मागून घे.’ तेव्हा शरण आलेला तो दैत्य म्हणाला, ‘देवानी व्याघ्र, तस्कर, सर्प किंवा अष्ट शक्तीनी मृत झालेले महापातकी यांचा ठिकाणी उद्धार होईल.या तीर्थी पिंडदानाने परमपदाची प्राप्ती होईल असे येथे तीर्थ निर्माण करावे.ते तीर्थ माझ्या देहावर निर्माण करावे.माझ्या नावचे तेथे लिंग स्थापन करून माझा देह पृथ्वीत दडपून त्या ठिकाणी तुम्ही वास्तव्य करावे.तू पापी लोकांना मुक्ती द्यावी, पौष अमावस्येस माझा तुम्ही वध केला म्हणून या दिवशी येथे स्नानदानादी कर्मे करणाऱ्यांना सद्गगती प्राप्त व्हावी. “तथास्तु’ म्हणून देवानी हे महालक्ष्मीचे पाकगृह हे स्थान दिले. तेव्हापासून विशालतीर्थ या नावाने हे ठिकाण प्रसिद्ध पावले.येथील यात्रा करून हटकेश्वराचे पूजन केले.हटकेश्वरासहीत पातालस्थित भोगावती नदी जनकल्याणाकरिता येथे वाहत आली.वृश्चिक राशीला गुरु असता विशालतीर्थाची यात्रा करावी. येथे मुंडण, तर्पण, पिंडदान पूजा.. विधी केले असता महापातकाचा संहार करून पितरांना सद्गती मिळून संतती वृद्धी होते.

गावाचे नाव शिंगणापूर का पडले याची कथा ?

अगस्तीमुनी माता लोपामुद्रा ला या तिर्थाचे महात्म्य सांगत आहेत. पूर्वी सुराष्ट्रात प्रजापालन तत्पर असा एक श्रृंगण राजा होऊन गेला.तो एके दिवशी सकाळी उठून पहातो तो त्याच्या मस्तकावर शृंग उत्पन्न झाल्याच त्यास दिसले. त्याने आपल्या पदरचे वैद्य बोलावून त्यास श्रृंग उत्पन्न होण्याचे कारण विचारले व त्याच्या परिहारार्धाचे उपाय करण्यास त्याने त्यास सांगितले. त्यांनी पुष्कळ वैद्यशास्त्रांत तत्सबधी शोध केला,परंतु शृंग (शिंग ) उत्पत्तीचे कारण त्यात आढळून येईना. त्यांपैकी शस्त्रवैद्य होते त्यांनी राजास सांगितले की,आम्ही ते शिंग कापून तो जागा पुर्ववत् करून देतो, त्याविषयी तुही काळजी करू नका. हे ऐकून राजा मनांत चिंताक्रांत होऊन या कामी त्याने आपल्या प्रधानाची सल्ला विचारली.त्याने सांगितले या वैद्याच्या उपायाने काही होणार नाही व श्रृंग कापण्याचे काम त्यांचेकडून करवू नये.नंतर राजाने वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांस बोलावण्यास सांगितले.ते आल्यानंतर त्यासही शृंगोत्पत्तीचें कारण विचारिले, परंतु कर्मविपाकग्रंथ पाहून त्यांनी राजास सांगितले की, शृंगोत्पत्तीचे कारण ग्रंथात कोठेही आढळून येत नाही.पुढे एकदा नारद मुनी त्या ठिकाणी आले.त्या राजाने पूजा करून त्यास भोजन घालून आपले श्रृंग त्यांस दाखविले व त्याच्या उत्पत्तीचे कारण काय व त्याचा नाश कशाने होईल असा प्रश्न केला.तेव्हा नारद मुनी राजास ह्मणाले,राजा  तू जन्मांतरी भिल्ल होतास, डोंगराच्या गुहेत राहून ब्राह्मणादि चतुर्वर्ण, गायी, पशु, व पक्षी यांच्या हत्त्या तू फार केल्या आहेस, चौर्य-कर्म, मुरापान, इत्यादि घोर पातके तू केल्यामुळे हे शिंग उत्पन्न झाले आहे.याच्या नाशाचा उपाय सांगतो तो ऐक. राजा ! देहाची प्राप्ति पूर्व पुण्याईनेंच होत असते.तुझ्या पूर्वपातकामुळे तुला नरक प्राप्तीच होणे वाजवी होते, परंतु तुझ्या देहांताचा योग असा काही विलक्षण आला की,त्या योगाने या जन्मी राजा झाला आहेस,ती कथा तुला सांगतो.तुं भिल्ल असताना एके दिवशी संध्याकाळपर्यंत तुला बघावयास कोणी न मिळाल्यामुळे तू डोंगराच्या दरीत वाट पहात बसला होतास.इतक्यात अचानक एक पांथस्थ त्या ठिकाणी आला.त्यास वधावयास तू धावत गेलास, व परमेश्वराचे स्मरण कर असे तू त्यास म्हणालास.तेव्हां पांथस्य बोलला की, हे भिल्ला मी सदोदित नारायणाचें स्मरण करीत असतो, परंतु तू मात्र कधीही करीत नाहीस, ते तू करून आपल्या जन्माचें सार्थक कर.

                  अगस्ती ह्मणाले, लोपामुद्दे नारदाचें भाषण ऐकून शृंगणराजाने श्रृंग पतन हाईपर्यंत तीर्थयात्रेचा संकल्प केला.आपला पुत्र श्रीधर यास आपला प्रधान चंद्रदत्त याच्या स्वाधीन करून आपण येईपर्यंत राज्य चालविण्यास त्यास सांगितले व आपल्या स्त्रीस बरोबर घेऊन तो तीर्थयात्रेस निघाला.पृथ्वीवरील तीर्थे पहात पहात तो करवीराच आला. श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन, अंतरगृही, दक्षिण व उत्तर-मानस-यात्रा करून त्याने शुक्लतीर्थात स्नान केले. तेथे त्याच्या पापाचा पंचमांश गेला.नंतर हटकेश्वराजवळ येऊन स्नान करू लागला तो त्याचे श्रृंग पतन पावले.नंतर त्या राजाने तेथे स्नान करून गणपती, महाकाली, सरस्वती, काळ-वेताळादि देवांची पूजा करून महालक्ष्मीचे पूजन केले व तिला नमन करून त्र्यंबुलीचे दर्शन घेतले.नंतर द्वारयात्रा करून लिंगाष्टकाचे दर्शन घेतले व पुनः विशालतीर्थास जाऊन यज्ञयागादि कर्मे करून त्याने आपल्या नावाची मूर्ति स्थापन केली.तसेच त्याने सर्व देवालयांचा व तीर्थांचा जिर्णोद्धार करून, तो परत आपल्या नगरास आला.आपला राजा बारा वर्षांनी आपला इष्ट हेतु साधून परत आला है पाहून त्याच्या प्रजाजनास फार संतोष झाला. तेथील सर्व जन करवारची महती वर्णन करू लागले व पुष्कळ लोक करवीरयात्रा करण्याकरिता निघाले, या ठिकाणी राजाचे श्रृंग पतन झाल्यामुळे त्यास श्रृंगणपूर (शिंगणापूर) असे नाव पडले.आपल्याला शिंगणापूर गावातील श्री विशालेश्वर व विशालतीर्थ हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top