आज शारदीय नवरात्र महोत्सवाची अष्टमी तिथी आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई महिषासुरमर्दिनी रुपात सजली आहे महिषासुरमर्दिनी हे जगदंबे चेभाविक भक्तांना भुरळ घालणारे एक सुंदर रूप. या रूपांमध्ये ती आई आहेच पण त्याबरोबर या आईचा रक्षणकर्ती हा भाव अधिक उठून दिसतो. इंद्रादी सर्व देवांना पराजित करून फक्त त्यांचा अधिकारच नव्हे तर त्यांचे निवासस्थान सुद्धा काढून घेऊन रंभ पुत्र महिषासुरा ने स्वतःचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. शंकराच्या वरदानानुसार त्याचा वध करणे नाही एका देवाला शक्य नव्हते तेव्हा सर्व देवांच्या एकत्र तेजातून देवी अवतीर्ण झाली. तिला दुर्गा सप्तशती मध्ये महालक्ष्मी असे नाव आहे. ही महालक्ष्मी सर्वस्याद्या महालक्ष्मी अर्थात म्हाळुंग गदा ढाल पानपात्र , मस्तकावर नाग लिंग योनि धारण करणाऱ्या आदिशक्ती महालक्ष्मी चा वैकृत्यात्मक अवतार. चतुर्भुज रूपामध्ये तीने सर्व देवांची निर्मिती केली यामुळे ती जगताची माता त्यामुळे समस्त देव व दैत्य तिला पुत्ररुप असतात म्हणूनच महिषासुराचा संहार करायला तिने पुन्हा एकदा सर्व देवांना दिलेले तेज एकत्र करून नवा विग्रह धारण केला या विग्रहाला अठरा हात होते असे वर्णन आहे. महिषासुर हा प्रत्येक कल्पात पुन्हा पुन्हा जन्माला आला देवीने कल्प भेदाने अनेक अवतार धारण करून त्याचा संहार केला.शक्तीपीठांच्या परंपरेत करवीर क्षेत्र हे महिषमर्दिनी चे क्षेत्र म्हणून ओळखले जाते यालाच अनुसरून आज अष्टमीच्या दिवशी करवीर निवासिनी महिषासूर मर्दना साठी सज्ज असलेल्या रूपामध्ये सजते. ही अनादि निर्गुण भवानी आमच्या अंतकरणात पुन्हा एकदा प्रकट होऊ दे धर्मरुप सिंहावरती स्वार होऊ दे. अष्टांग योगाची आयुध धारण करू दे. आणि आमच्या मोह महिषासुराचा संहार करू दे हाच या चण्डिके चरणी जोगवा मागतो
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top