ऐतिहासिक वास्तू पहा

अतिप्राचीन काळापासून जगभर ज्या विविध संस्कृती विकास पावल्या, त्यांत या गृह-वास्तुप्रकाराच्या वैविध्यपूर्ण व विपूल रचना झाल्याचे आढळून येते. भारतात राजवाडे प्रामुख्याने तीन कालखंडात आणि शैलीत बांधले गेले.पहिला भारतीय संस्थानिकांचा कालखंड, दुसरा मोगल राज्यकर्त्यांचा आणि तिसरा ब्रिटिश राजवटीचा कालखंड. भारतीय संस्थानिकांनी साधारणपणे १५०० नंतर देशभर विविध ठिकाणी राजवाडे बाधंले. बहुपर्णी कमानी, चबुतरे, अष्टकोनी किंवा गोलाकार स्तंभरचना, पाषाणी छज्जे, सूक्ष्म नक्षीकाम केलेल्या संगमरवरी जाळ्या, भव्य अवकाशरचना, भिंतीवरील गिलाव्यात केलेले जडावकाम, लांबट, षट्कोनी, अष्टकोनी, गोल घुमटरचना व या विविध वास्तुघटकांमुळे, त्यांच्या संयोजनामुळे राजवाड्याच्या निर्मितीला लाभणारा खास हिंदुस्थानी शैलीचा भव्यपणा आढळून येतो.

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top