जुन्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका करायची तर चंद्रकांत मांडरे यांनीच असे अनेक जानकार सांगतात.मराठीतील दिग्गज अभिनेते तसेच ज्यांच्या ऐतिहासिक भूमिका अजरामर झाल्या आहेत ते म्हणजे चंद्रकांत मांडरे,यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ ला कोल्हापुरात झाला.कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या हाताखाली ते नोकरी करू लागले.तर बाबा गजबर यांच्याकडून चित्रकलेचे शिक्षण घेतले.युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, संथ वाहते कृष्णामाई, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी अशा चित्रपटांतून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अधिक उंचीवर नेले. चंद्रकांत मांडरे यांना अभिनयाबरोबर कलेची आवड होती,दीर्घ कालखंडात त्यांनी असंख्य निसर्गचित्रे रेखाटली.१० मार्च १९८७ साली चंद्रकांत मांडरे यांनी ‘निसर्ग’ या आपल्या निवासस्थानात संग्रहालय केले.पुढे हे संग्रहालय १० मार्च १९८७ रोजी राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये विभागाकडे सुपूर्द केले
काय पाहाल
संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दालनात त्यांनी निरनिराळ्या चित्रपटात केलेल्या विविध भूमिकांची छायाचित्रे आणि पारितोषिके प्रदर्शित केली आहेत.छायाचित्र दालन, पावडर शेडिंग दालन, चित्रकला दालन चार विभागांत संग्रहालयात पाहायला मिळते.मांडरे यांच्या निसर्गचित्रांची स्थळे मुख्यत: चार भागात विभागली आहेत. पहिला कोल्हापूर आणि परिसर, दुसरा राज्यातील महत्त्वाची निसर्गरम्य स्थळे, वास्तू, तिसरा राज्याबाहेरील स्थळे, ऐतिहासिक इमारती आणि चौथा म्हणजे परदेशातील पर्यटनस्थळे, शहरे इत्यादी. त्यांची बहुतांशी निसर्गचित्रे ही मुख्यत: कोल्हापूरच्या हिरव्यागार डोंगरकुशीतील आहेत. सभोवतालची झाडे-झुडपे, नदी-नाले, डोंगर-टेकड्या, शेती-वाडी-वस्त्या, रस्ते, जुन्या इमारती, मंदिरे अशी रोजच्या परिचयाची दृश्ये त्यांनी निसर्गचित्रांचा विषय बनवली आहेत. त्यांच्या चित्रात कोल्हापूर आणि परिसर पुन्हा पुन्हा नवनव्या रुपात भेटतो.यामध्ये शालिनी पॅलेस,न्यू पॅलेस, श्री अंबाबाई मंदिर,कणेरी मठ,पंचगंगा घाट,ब्रम्हपुरी,गुऱ्हाळे,रंकाळा,संध्यामठ,पन्हाळ्यावरील अंबरखाना, पुसाटी बुरुज,नायकिणीचा सज्जा,पन्हाळ्यावरून दिसणारा पावनगड,नागझरी पॉइंट,कोतोली परिसर, आंबेवाडी तलाव,त्र्यंबुली देवी,गंजीमाळ,तोफेचा माळ, विल्सन ब्रिज,कोटीतीर्थ माळ,पंचगंगा प्रयाग,सिद्धोबाचा डोंगर,गुलमोहोर यांसारखी स्थळे चित्रांत डोकावतांना दिसतात
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
मुख्य बसस्थानक - राजारामपुरी ७ वी गल्ली - चंद्रकांत मांडरे कलादालन
काही महत्वाच्या गोष्टी
संग्रहालयाची वेळ
सकाळी 10.30 ते दुपारी 1.00
दुपारी 1.30 ते सायंकाळी 5.00
प्रवेश शुल्क - प्रौढांसाठी 10 ₹ आणी मुलांसाठी 5 ₹
( संग्रहालयात फोटो घेण्याची परवानगी नाही )
संग्रहालय सोमवारी बंद राहते.