वाघजाई देवी | Vaghajai Devi
कोल्हापूर पासून अवघ्या सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर श्री वाघजाई देवीचे मंदिर आहे. कळंबे तर्फे कळे या गावापासून उजव्या बाजूने जो रस्ता जातो तो थेट रस्ता देवीच्या मंदिरा पर्यंत जातो. देवीचे मंदिर हे डोंगरावर असल्यामुळे आसपासचा परिसर सुंदर दिसतो. या मंदिरावरून आपल्याला सातेरी चा डोंगर तुमजाई देवीचा डोंगर दिसतो. मुख्य मंदिराच्या पायथ्याला आपल्याला विहीर दिसते या विहिरीला अजून मोट आहे ती पाहता येईल.विहिरीच्या समोरच एक छोटे देवीचे मंदिर आहे. महिषासुरमर्दिनी स्वरूपात देवीचे रूप आहे, देवीची मूर्ती साधारण दोन ते अडीज फूट आहे,देवीच्या उजव्या वरच्या हातात गदा तर उजव्या खालच्या हातात खडग आहे डाव्या वरच्या हातात ढाल तर डाव्या खालच्या हातात असुराच मुंड आहे.सदरची मुर्ती सिंहावर आरूढ आहे,तर शेजारी रेड्याचे मुख आहे.मंदिराच्या बाहेर शिवलिंग व नंदी दिसतो. या विहिरी पासून वाघजाई देवी ला जाण्यासाठी मार्ग आहे.मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्यांची सुरुवात होते. काही वेळेतच आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो.देवीच्या मुळ मंदिराचा गाभारा आहे तसा ठेवून नविन मंदिराची बांधणी केली आहे.वाघजाई देवीचा तांदळा आहे.साधारन एक ते सव्वा फुटी तांदळा आहे.देवीची पुजा तांदळ्या वर बांधण्यात येते. शेजारी दुर्गामातेची मुर्ती आहे व इतर देवता आहेत.मंदिराच्या एका खांबात श्री गणेशाची मुर्ती कोरलेली आहे.व शेजारी श्री नागदेव व श्री हनुमानाची मुर्ती आहे.मंदिराच्या बाहेर दिपमाळ आहे व दिपमाळेच्या खालील बाजुस इतर देवतांचे तांदळे आहेत.मंदिराच्या समोर दोन छोटी देवळे आहेत त्यामध्ये पायांचे पादुका दिसुन येतात.निसर्ग व मंदिराची अनुभूती घेण्यासाठी कोल्हापूर पासून काहीच अंतरावर असल्यामुळे हे मंदिर अवश्य पहावे.