राजाराम विद्यालय


महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे संस्थान म्हणून कोल्हापूर संस्थानचा ब्रिटिशांशी वारंवार संबंध येई.यातूनच त्यांच्यात चांगले संबंधही निर्माण झाले. कोल्हापुरात महाविद्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्यासाठी नवीन इमारत बांधण्याची जबाबदारी मेजर चार्ल्स मॅंट याच्याकडे आली.जुन्या राजवाड्याला लागून असलेली मोकळी जागा कॉलेजला दिली.वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेला नगारखाना आणि जुन्या धाटणीच्या राजवाड्याला शोभून दिसेल अशी कॉलेजची इमारत बांधण्याची जबाबदारी मेजर चार्ल्स मॅंट याच्यावर होती.मेजर चार्ल्स मॅंट यांनी अशा प्रकारे राजाराम कॉलेजची रचना केली,की ही नवी प्रशस्त आणि हवेशीर इमारत जुन्या राजवाड्याचाच भाग वाटावी.
यामुळे कोल्हापूर दरबारची मेजर मॅंटवर विलक्षण मर्जी बसली.इमारतीला छोटे छोटे घुमट असून त्यांना अतिशय नाजूक बांधणीच्या खांबांचा आधार आहे.त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी सज्जे असूनत्या सज्जांना वक्राकार तक्तपोशी आहेत. दोन मजल्यांची ही इमारत काळ्या घडीव दगडात बांधलेली आहे. त्याशिवाय मध्ययुगीन पद्धतीने बांधलेले दोन सुंदर बहुकोनी बुरुज व अनेक खांबांचा आधार असलेला घुमट आहे. घुमटाच्या आतल्या बाजूला कमळाचे पान कोरलेले आहे. या इमारतीला अंशतः तिसरा मजला आहे. या मजल्याचे बांधकाम नंतरच्या काळात झाले असावे, कारण त्याची बांधणी मूळ वास्तूच्या शिल्पाबरोबर जुळणारी नाही. पहिल्या प्रथम ही इमारत राजाराम विद्यालयासाठी बांधण्यात आलेली होती. परंतु १८८० मध्ये राजाराम महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर राजाराम विद्यालय दुसरीकडे हलविण्यात आले आणि राजाराम महाविद्यालय या वास्तूमध्ये सुरू करण्यात आले. या इमारतीत प्रशस्त असे सभागृह आहे. इमारतीच्या पाठीमागील बाजूस अलीकडच्या काळात बांधण्यात आलेले खुले नाट्यगृह आहे.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण 2.8 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places



