साहसी खेळ अनुभवा

खेळण्याची प्रवृत्ती ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.लहान बालकापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच खेळांची आवड असते.खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा व चिंता विसरावयास लावून मनाला विरंगुळा देण्याचे तसेच शरीर व मन ताजेतवाने करण्याचे काम विविध खेळ करू शकतात. शारीरिक श्रमांच्या खेळांत शरीरास भरपूर व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शरीर काटक व बळकट बनते. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडू वृत्ती इ. गुणांचीही वाढ होते. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना व नेतृत्वगुण यांना वाव मिळतो आणि या गुणांचा जीवनात विविध प्रसंगी उपयोग होतो.खेळातील चढाओढीमुळे खेळांचा दर्जाही वाढतो. राष्ट्राराष्ट्रांतील क्रीडास्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय सामंजस्यही वाढीस लागते.निरनिराळ्या खेळांतील कौशल्य, प्रावीण्य व श्रेष्ठता अजमावण्यासाठी खेळांच्या स्पर्धा, सामने व शर्यती विविध पातळ्यांवर आयोजित केल्या जातात. या स्पर्धांना खेळीमेळीचे स्वरूप असते आणि यशस्वी खेळाडूंना पारितोषिके व पदके देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. 

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुस्ती या खेळाला विशेष असे महत्त्व आहे.शाहू महाराजांच्या आधीही कुस्तीची ही परंपरा सुरू होती परंतु छत्रपती शाहू महाराजांनी जे कुस्तीसाठी योगदान दिल यामुळे कोल्हापूर ला कुस्तीची पंढरी असे संबोधले जाते.कोल्हापूर मध्ये कुस्ती चे प्रमाण वाढावे येथील स्थानिक मल्ल तयार व्हावेत यासाठी शाहू महाराजांनी अनेक आखाडे सुरू केले या आखाड्या ला तालिम असेही संबोधले जाते.या आखाड्यामध्ये गंगावेश आखाडा, यमोतीबाग आखाडा,शाहुपुरी आखाडा प्रसिद्ध होता.आजही गंगावेश व मोतीबाग आखाडा मध्ये सराव केला जातो.अनेक मल्ल येथे नित्य नियमाने आपल्या गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनाने येथे व्यायाम करत असतात. कुस्तीमध्ये आहार खूप महत्त्वाचा आहे.अनेक मल्ल हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मल्लांच्या आहारासाठी विशेष आर्थिक सहाय्य देखिल शाहू महारांजानी त्यावेळी दिल आहे यामुळेच राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर साठी रयतेचे राजे होते.

शिवकाळामध्ये मर्दांनी खेळ विशेष असे महत्व आहे.शिवाजी महारांजानी अनेक मोहिमा या युद्ध कौशल्य व या पारंपारिक मर्दानी खेळावर जिंकल्या आहेत.मर्दानी खेळामध्ये तलवार,दांडपट्टा,विटा,भाला,कट्यार,ढाल येतात.कोल्हपुरमध्ये विशेषता अनेक पेठांमध्ये मर्दानी खेळाचे आखाडे हे सुरू आहेत.यामध्ये शिवजयंती,गणेश उत्सव, नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवली जातात.सध्या आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था,ठोंबरे वस्ताद, शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच, रामकृष्ण मर्दानी आखाडा, जुना बुधवार मर्दानी खेळाचा आखाडा, शिवगर्जना,शिवशक्ती प्रतिष्ठान,सह्याद्री प्रतिष्ठान अशा असंख्य संस्थांमध्ये मर्दानी खेळाचे शास्त्रोक्त आणि मोफत शिक्षण आखाड्यांतून मिळते.याचबरोबर उन्हाळी सुट्टीवेळी अनेक संस्था महिलांना सक्षम होण्यासाठी मर्दानी खेळाचे शिबिर आयोजित करतात.

माजलेल्या हत्तीला रंगणामध्ये मोकळा सोडून त्याला डिवचण्याचा वा चिडविण्याचा एक खेळ,मस्तवाल हत्तीशी झुंज देण्याचा हा साहसी खेळ आहे.या खेळात हत्तीशी झुंजणारा जो मल्ल वा खेळाडू असतो, त्याला साठमार,साठमाऱ्या किंवा साठ्या असे म्हणतात.एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कोल्हापूर व बडोदे संस्थानात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता आणि पाहुण्यांसाठी विशेषता इंग्रज गव्हर्नरसाठी तो खास प्रदर्शित केला जाई.हत्तीच्या झुंजीसाठी पूर्वी खास मैदान तयार करीत असत,त्याला ‘अग्गड’ अशी संज्ञा होती.त्याला साठमारीचा आखाडाही म्हणत.अशा प्रकारचे अग्गड बडोदे येथे असून साठमारीचे आखाडे कोल्हापूरमध्ये व कोल्हापूर संस्थानात राधानगरी, सोनतळी, रूकडी आणि पन्हाळा येथे छ. शाहू महाराजांनी बांधून घेतले होते.सध्या पन्हाळा व मंगळवार पेठेत रावणेश्वर मंदिराच्या शेजारी या वास्तू पाहता येतील.

                   कोल्हापूरच्या कुस्तीला मोठी परंपरा आहे.छत्रपती घराण्याने कुस्ती बरोबर फुटबॉलला राजाश्रय दिल्याने गेल्या 100 वर्षांपासून फुटबॉल कोल्हापुरात रुजला.शहरातल्या पेठांचे फुटबॉल संघ तयार झाले.फुटबॉल आणि कोल्हापूर यांचं नात हे तसं फार जुनं. १९३० पासून कोल्हापुरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी या शहरात फुटबॉल खेळाची बीज रोवली.आज 92 वर्षांच्या कालावधीनंतर कोल्हापुरात फुटबॉलचे तब्बल १२५ संघ असून,या संघांद्वारे २५०० हजार खेळाडू मैदानात आपलं भविष्य आजमवत असतात.Kolhapur Sports Association ही जिल्ह्यातली फुटबॉलपटूंचं पालकत्व स्वीकारलेली एकमेव संस्था.छत्रपती शाहू महाराज आणि मालोजीराजे खासदार संभाजी राजे,यांच्या घराण्याकडे सध्या या संस्थेची सूत्रे आहेत.त्यामुळे शहरात फुटबॉलचा प्रसार होण्यास महत्त्वाचा हातभार लाभतो.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे,कोणत्याही प्रकारच्या शासकीय मदतीशिवाय ही संस्था कोल्हापूर जिल्ह्यातल्या फुटबॉलपटूंचा सांभाळ करतेय.प्रत्येक खेळाडूला आर्थिक पाठबळासह,साधनसामग्री पुरवण्याचं महत्वाचं काम ही संस्था करतेय.जिल्हा स्तरावर खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धांनाही थेट २५ हजार रुपयांपर्यंत रोख रकमेचं इनाम देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमधलं पोलो मैदान,शाहू मैदान,शिवाजी स्टेडियम,गांधी मैदान हे या तरुण खेळाडूंसाठी आता हक्काचं घर बनून गेलं आहे.सहा महिन्याहुन अधिक काळ फुटबॉल हंगाम चालतो.यामध्ये कमालीची चुरस अनुभवायला मिळते.प्रत्येक संघाच्या उभारणीमागे राजकीय गणितं असतात.मात्र आपल्या संघावर जीव ओवाळून टाकणारे समर्थक आवर्जून पाहायला मिळतात.आपल्या संघाची लढत असेल तर नोकरीत हमखास सुट्टी टाकून मैदानावर उपस्थिती दर्शवणारे समर्थक कमी नाहीत.

              मुलांप्रमाणेच कोल्हापुरात मुलींचेही स्वतंत्र संघ आहेत.स्थानिक पातळीवर सामन्यांमध्ये खेळताना त्यांच्यातले गुण,फुटबॉलची समज ही प्रकर्षाने जाणवते.एखाद्या पुरुष खेळाडूला मागे टाकतील असा खेळ सध्या कोल्हापूरच्या रणरागिणी करतायत.

साधारणपणे इसवी सनपूर्व २००० च्या दरम्यान पर्सियामध्ये हॉकी खेळाची सुरुवात झाली. प्राचीन काळी ग्रीक लोक हा खेळ खेळत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. ‘ब्लॅक हेथ’ नावाने पहिला हॉकी क्लब स्थापन करण्यात आला. या खेळाचे नियम सुरवातीला विंबल्डन हॉकी क्लबतर्फे व त्यानंतर १८८६ साली हॉकी असोसिएशन तर्फे तयार केले गेले. पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना १८९५ साली इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांदरम्यान खेळला गेला. १९०८ साली ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा हॉकीचा सामना खेळला गेला.कोल्हापूरमधील गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावही असेच हॉकीला राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंची रसद पुरवण्यात अग्रेसर आहे. या गावातील इंदिरादेवी जाधव इंग्लिश स्कूल या शाळेचा सिंहाचा वाटा आहे. शाळेने घराघरात हॉकी खेळाडू निर्माण केला आहे. म्हणूनच या गावाला हॉकीची पंढरी असा नावलौकिक प्राप्त झाला आहे.आतापर्यंत गेल्यात त्रेचाळीस वर्षात या शाळेने ५०० हून अधिक राष्ट्रीय हॉकी खेळाडू निर्माण केले. दरवरषी ८ ते १० खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवडले जातात. शाळेच्या दहा ते बारा खेळाडूंची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झालेली आहे. हॉकी खेळात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरु चषक स्पधेत १९८४, २००३, २०१२ अशा तीनवेळा शाळेच्या संघाने दिल्लीवर स्वारी केली आहे.

क्रीडानगरी अशी कोल्हापूरची ओळख.कमालीची जिद्द जिंकण्याची आतूर ईर्ष्या हे या मातीतील खेळाडूंचे अंगभूत कौशल्य.या कौशल्याच्या जोरावर,नेमबाजी,क्रिकेट,फुटबॉल,कुस्ती,जलतरण,बुद्धिबळ,कबड्डी अशा सर्वच खेळांमध्ये कोल्हापूरचे नाव महाराष्ट्रात पर्यायाने देशभरात पोहोचवले.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धात दैदिप्यमान कामगिरी करत क्रीडानगरी ही बिरुदावली आणखी बळकट केली.क्रिकेट म्हणजे केवळ मुलांचा खेळ असा समज असताना स्थानिक स्पर्धांत बॉलगर्ल म्हणून काम करणाऱ्या अनुजा पाटीलने भारतीय महिलांच्या क्रिकेट संघात स्थान पटकावले आहे.

लेझीम हा वीररस युक्त नृत्य प्रकार आहे.ढोल आणि हलगी च्या तालावर हे नृत्य सादर केले जाते.लेझीम मध्ये विविध नृत्य प्रकार येतात.लेझीम मध्ये विशिष्ट तालबद्ध हालचाली असतात.हा व्यायामप्रकार म्हणूनही ओळखला जातो.काही शाळांमध्ये शारीरिक शिक्षणात ह्या प्रकाराचा समावेश केला जातो.अनेक गावामध्ये गणेशोत्सव,गावातील कुलदेवाताच्या यात्रावेळी लेझीम खेळली जाते.

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top