कोल्हापूर ते बहिरेश्वर अंतर 16 ते 18 कि. मी. रंकाळापासून गगनबावडा – कणकवली हायवेवर आहे.कसबा बीड गावाकडे जाताना बहिरेश्वरसाठी मध्येच उजव्या बाजूच्या फाट्याने आत जायला एक रस्ता आहे. रस्ताने जात असताना गावाची स्वागत कमान दिसते,काही अंतरानंतर आपन मंदिरापर्यंत पोहचतो.तळ्याच्या मध्यभागी असलेले प्राचिन अस हे मंदिर आहे.श्री विष्णूची शाळीग्राम मधील ही मुर्ती आहे.मंदिर आकाराने लहान आहे.गाभारा ही एकच छोटी खोली आहे त्यात शेषनागावर निद्रिस्त विष्णूची मूर्ती आहे.मुर्ती खूपच आखीव – रेखीव आणि सुंदर आहे. हे शिल्प शाळीग्राम दगडात कोरलेलं असून मंदिराबाहेर कृष्ण शिल्प शिळा व सतीशिळा आहे.एखादी महिला आपल्या पतीच्या मृत्यूनंतर सती गेली असेल तर तिच्या स्मृती प्रित्यर्थ एक शिळा बनवली जायची त्याला सती वृंदावन किंवा सतीशिळा म्हणतात.