कोल्हापूर महानगरपालिका इमारत ही शिवाजी चौकानजीक भाऊसिंगजी रस्त्यावर आहे. आयताकृती असलेली ही इमारत काळ्या घडीव दगडांमध्ये बांधलेली असून तिला दोन मजले आहेत.छोटासा तिसरा मजला प्रत्येक बाजूच्या माथ्यावर बांधण्यात आलेला आहे.पहिल्या मजल्याला कमान असलेली गच्ची बाहेरच्या बाजूला आहे.इमारतीला मध्यभागी एक चौक आहे. पहिल्या मजल्यावर नवीन आणि जुना असे दोन दिवाणखाने आहेत.त्यांचा उपयोग पालिकेच्या बैठकीसाठी करण्यात येतो. नवे सभागृह १९५३ मध्ये बांधण्यात आले.इमारत हि दोन विभागांमध्ये बांधण्यात आलेली आहे.पूर्वेकडचा आणि दक्षिणेकडचा विभाग आणि उत्तरेकडील विभागाचा छोटासा भाग १९२९ मध्ये बांधण्यात आला.त्यासाठी १,६०,००० रुपये खर्च आला. पश्चिमेकडचा विभाग आणि उत्तरेकडच्या विभागाचा थोडासा भाग यांची बांधणी १९५५ साली करण्यात आली. या बांधकामासाठी २,७४,००० रुपये खर्च झाले.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण 2.5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.