हत्ती महाल,राधानगरी
राधानगरी परिसरावर राजर्षी शाहू महाराजांचे शिकारीच्या निमित्ताने सारखे येण जाण असेे. राधानगरी धरणाच्या निर्मिती संकल्पनेनंतर या परिसराला शाहूंचा प्रदीर्घ सहवास लाभला.त्यातूनच पुढे राधानगरी शहराची निर्मिती झाली.राधानगरीपासून धरणाकडे जाणा-या मार्गावर दोन कि.मी अंतरावर शाहू महाराजांच्या काळात या ऐतिहासिक हत्तीमहालाची निर्मिती झाली. हत्तीमहाल म्हणजे हत्ती ठेवण्याची किंवा खेळण्याची साठमारी. एकमेकांशी काटकोनात असणा-या भव्य दोन इमारती आणि प्रत्येक कोप-यातील प्रवेश कामानीने एकमेकांशी जोडला गेल्याने आतील बाजूस भव्य चौक असे या इमारतीचे वर्णन आहे.
संपूर्ण इमारत दगडी बांधकामातील दुमजली असून तळमजला आणि पहिल्या मजल्यावर लोखंडी पँनेलवर भाजीव विटांच्या सहाय्याने घालण्यात आलेला स्लब त्यावेळच्या वास्तुकलेचा एक आदर्श उत्तम नमुनाच म्हणावा लागेल.यापैकी खालील समोरच्या दोन इमारतीमध्ये हत्ती बांधण्यासाठी दोन हॉल असून या इमारतींना छोटी प्रवेशद्वारे आहेत,तर वरच्या मजल्यावर प्रेक्षाग्रह म्हणून वापरण्यात येत असावे. चिडलेल्या हत्तींचे चित्कार आणि आपापसातील झुंज हि या खेळाची वैशिष्ठे होती.हत्तिमहालाच्या मागिल बाजूस भव्य असे पिंपळाचे झाड आहे.हत्तीमहाला शेजारी एक छोटेे हनुमानाचे मंदिर आहे.