सुंदर देशा,पवित्र देशा याबरोबरच विविध परंपरांनी समृद्ध देशा आणि सुंदर कलांच्या देखण्या देशा असेही महाराष्ट्राचे वर्णन करायला हवे.जे जे उत्कट,उदात्त, उन्नत ते ते सर्वत्र देशी पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. सह्याद्रीच्या राकट रांगा, किल्ले, सागरकिनारे,मंदिरे,गर्द वनराई, खडकामध्ये खोदलेली लेणी, जुनी अप्रतिम मंदिरे आणि त्यामध्ये असलेल्या अत्यंत सुबक आणि देखण्या मूर्ती, अभयारण्ये ही तर आपली वारसास्थळे आहेतच,हि आपण जपली पाहिजेत.आज काही गावामध्ये अनेक विरगळ व सतीशिळा सापडतात याचे योग्य संवर्धन होणे गरजेचे आहे.