पोहाळे लेणी । Pohale Leni
कोल्हापुरला आलेल्या प्रत्येक पर्यट्काचा उद्देश हा ज्याप्रमाणे श्री महालक्ष्मी आई अंबाबाईचे दर्शन हा असतो.त्यानंतर त्याची आपसुक पावले श्री श्रेत्र जोतिबाकडे वळतात.श्री जोतिबा म्हणजेच वाडी रत्नागिरीला आपण वडणगे, कुशिरे मार्गाने जोतिबाकडे जाताना जोतिबाच्या पायथ्याशी पोहाळे गावाच्या माथ्याशी पोहाळे लेणी कोल्हापुर पासुन 15 कि.मी. अंतरावर आहेत.रस्तालगतच खाली काही अंतर चालुन गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत पोहाळे लेण्याचे दर्शन होते.त्याच्या बाजुस विहार आहे हा प्रशस्त असुन 35*32*9 इतका आहे तो स्तंभावर पेलला आहे.यावरील एका स्तंभावर चंद्र, सुर्य, घोडा कोरली आहेत.सध्या लेण्याच्या डाव्या व उजव्या बाजुची बरीच पडझड झाली आहे.या लेण्यांसमोरही पाण्याचा योग्य निचरा करणेकरिताचे छॊटे पाट आहेत.लेण्यांतील खिडक्या- दरवाजांची रचना पाहता स्वच्छ, खेळती हवा राहणेच्यादृष्टिने केलेली व्यवस्था आढळते.तसेच पावसाच्या पाण्यापासुन संरक्षण होणेकरिता समोरील छत दरवाज्याच्यापुढे असुन व्हरांडा आहे,तर दोन्ही बाजुच्या भिंतीना खिडक्या (दालने)असुन बाजुचा भाग भिंतींनी पुर्ण बंद आहे.या भागात पडणा-या पावसाच्या पध्दतीचा देखील लेणी खोदताना अभ्यास केला आहे.येथील खडक जांभा असल्यानेच लेण्यांची पडझड झाली आहे.सध्या लेण्यासमोर मध्यावर एक पिंपळाचे झाड आहे.येथे बाराही महिने पाणी उपलब्ध आहे.आपण अगदी कमी वेळात हे सुरेख लेण पाहु शकता तर जोतिबाला जाताना गाडी या थांब्यावर थोडया वेळाकरिता नक्की थांबवा.