राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक स्मारके बांधली त्यापैकी एक पन्हाळा गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर.या मंदिरात असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची साधारण १.५ ते २ फुट संगमरवरातील अश्वारूढ मूर्ती आहे.१९१३ साली हि मूर्ती बसवण्यात आली. कागल येथील मूर्तिकार सुतार यांनी हि मूर्ती बनवली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा ज्या ज्या वेळी पन्हाळगडावर मुक्काम असायचा त्या त्या वेळी या मंदिरात शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नसायचे. आज देखील अनेक कार्यक्रम व उपक्रमांची सुरवात सध्याचे शिवप्रेमी युवक व युवती किल्ले पन्हाळगड या ठिकाणी गेल्यानंतर या मंदिरापासूनच दर्शन घेऊन करतात. शिवजयंतीच्या निमित्ताने लाखो शिवभक्त किल्ले पन्हाळगडावर येतात त्यावेळी याच ठिकाणी मंदिरात दर्शन घेऊन , मुजरा करून या ठिकाणी सोबत आणलेली ज्योत ( मशाल ) प्रज्वलित करून घेऊन तिथून पायी आपापल्या गावी व कोल्हापुरात येतात..
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - आंबेवाडी - केर्ले - वाघबीळ - बुधवार पेठ - पन्हाळा गड येथून स्थानिक लोकांना विचारून पोहचता येईल.
काही महत्वाच्या गोष्टी
१..हे ऐतिहासिक ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.मंदिराच्या मागच्या बाजूस साठमारी व गुहा पाहता येतील.
३.स्मारकाच्या येथे पार्किग सुविधा आहे.