मोरजाई पठारावरील सतीशिळा,गगनबावडा
बोरबेट गावाच्या पश्चिमेला असलेल्या डोंगरावर मोरजाई देवीचे विस्तीर्ण पठार पसरलेले आहे.अतिशय प्राचिन हे ठिकान आहे.मंदिराच्या पायर्या चढून पाषाणी स्तंभाच्या येथे आपन पोहचतो दोन उभे दगड आणि त्यावर एक आडवा दगड अशी या स्तंभद्वारांची रचना आहे.अशी तीन स्तंभद्वारे ओलांडून आपण मोरजाईच्या गुंफा मंदिरापाशी पोहोचतो. हे मंदिर पूर्णत गुहेत असून त्याचे शिखर गुहेच्या वर बांधून काढण्यात आले आहे.या गुंफामंदिरात एकूण ६२ प्रतिमा पाहायला मिळतात.त्यापैकी फक्त दोन वीरगळ असून ४४ सतीगळ आहेत.९ मूर्तीवर युगुल प्रतिमा कोरल्या आहेत, तर ७ मूर्तीवर एकल प्रतिमा कोरल्या आहेत.मुख्य गुहेजवळच दुसरी एक छोटी गुंफा असून, त्यामध्ये सात सतीगळ आहेत. बाहेरच्या बाजूला तिसरी गुंफा असून त्यामध्ये देवीच्या चार मूर्ती आहेत.अशा प्रकारे एकाच ठिकाणी तब्बल ७३ मूर्ती असून,त्यापैकी ५१ सतीगळ आहेत.












Previous
Next
एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी सतीगळ आढळण्याची ही विरळ घटना आहे.एवढे सतीगळ या ठिकाणी असण्याचे एक कारण असू शकते. ते म्हणजे या परिसरातील सती गेलेल्या स्त्रियांची स्मारके असलेले हे सतीगळ नष्ट होऊ नयेत, त्यांचे पावित्र्य भंगू नये, यासाठी ते या पठारावरील गुहेत आणून ठेवले असले पाहिजेत.पुढे केव्हातरी या गुहेत मंदिर तयार करून त्यात मोरजाई देवीची स्थापना करण्यात आली असावी. मोरजाई देवीच्या मूर्तीवरून ती तुलनेत अलीकडची असल्याचे स्पष्ट होते.पठाराच्या पश्चिमेला दगडांचे पाच उंच आपले लक्ष वेधून घेतात.याशिवाय मंदिराजवळच दोन समाधीही आहेत.बाजूलाच कातळामध्ये खोदून काढलेली एक टाकी आहे.पावसाळ्यात यामध्ये पाणी साठते. पठारावरून परिसरातील दृश्य अतिशय रमणीय दिसते.पठार संपूर्ण जांभ्या खडकामध्ये आहे.पठारावरून अनेक परिसर आपल्याला पाहता येतात.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण ६१ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - रंकाळा तलाव - बालींगे - आसगाव - साळवन - शेनवडे - असळज - सांगशी - बोरबेट येथून स्थानिक लोकांना विचारून पोहचता येईल.
काही महत्वाच्या गोष्टी
१.हे प्राचीन ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.गावामध्ये पार्किग सुविधा आहे
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places



