कोल्हापूर हे प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा जपणारे शहर आहे.राजा भोज ( दुसरा ) याची कसबा बीड हि राजधानी होती,यामुळे कसबा बीड या गावात अजूनही शेताची काम करताना भोज काळातील मुद्रा सापडतात.तसेच अनेक विरगळी व सतीशीला आज हि सापडतात.कसबा बीड येथे प्राचीन महादेव मंदिर आहे.कसबा बीड मध्ये अनेक विरगळ सुव्यस्थित आहेत याचे योग्य संवर्धन व्हावे यासाठी कोल्हापुरातील शिवशक्ती प्रतिष्ठान हि संस्था व कसबा बीड ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पहिले विरगळ स्मारक या महादेव मंदिरच्या आवारात केले आहे.सदरच्या विरगळ व्यवस्थित राहाव्यात यासाठी पत्राचे शेड व लाईट ची सोय करण्यात आली आहे.
Previous
Next
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण १६ ते २० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
येथे महादेवाचे मंदिर आहे.यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.स्मारकाच्या येथे पार्किग सुविधा आहे.
3.कसबा बीड मध्ये प्राचीन गणपती,गजलक्ष्मी तसेच हनुमान मंदिर हि सर्व ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
४.ग्रामस्थांना विनंती केल्यास राजा भोज यांच्या मुद्रा पाहता येतील.