इतिहासातील सर्वात प्रेरणादाई व्यक्तीमत्व म्हणजे शककर्ते छ.शिवाजी महाराज,महाराजांनी अनेक यशस्वी मोहिम केल्या त्यापैकी एक म्हणजे पन्हाळागडावरून सिद्दी-जौहरच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडून छ.शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले.13 जुलै 1660 चा दिवस या दिवशी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे,रायाजी बांदल व अनेक ज्ञात - अज्ञात बांदल सेना यांनी पराक्रम दाखवला या वीरांची आठवण म्हणून गजापूर गावामध्ये पावनखिंड येथे स्मारक आहे.आज पावनखिंड पाहायला अनेक पर्यटक येत असतात निसर्गाबरोबरच या स्मारकाला पन अभिवादन करावे.
Previous
Next
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण ६५ ते ७० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
१.हे ऐतिहासिक ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.स्मारकाच्या येथे पार्किग सुविधा आहे.
3.जुलै महिन्यात कोल्हापूरातील अनेक संस्थेच्या माध्यमातून दोन दिवस चालत पन्हाळा ते पावन खिंड या मोहिमेचे आयोजन केले जाते.यावेळी आपन सहभागी होवू शकता.