छत्रपती.शाहू महाराज समाधी,नर्सरी बाग


छ.शाहू महाराजांचे निधन ६ मे १९२२ रोजी मुंबईत झाले. दुस-या दिवशी कोल्हापुरात पंचगंगेकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छत्रपती घराण्याचे राजगुरू पंडित रघुपती महाराज हे शाहू महाराजांचे स्नेही होते.या पंडित महाराजांची समाधी नर्सरी बागेत करावी आणि त्याच्यालगतच आपल्याही छत्रीची व्यवस्था करावी, असा ठराव शाहू महाराजांनी आपल्या हयातीतच १३ सप्टेंबर १९१६ रोजी केला होता. प्रत्यक्षात पंडित महाराजांची समाधी पंचगंगेच्या काठावर आहे. शाहू महाराजांची समाधी मात्र झालीच नाही.सिद्धार्थनगर भागातील नर्सरी बागेमध्ये आपले समाधी स्मारक व्हावे, अशी इच्छा शाहू महाराजांनी मृत्यूपूर्व इच्छापत्रामध्ये नमूद केली होती. यानंतर अनेक वर्ष छ.शाहू महाराजांची समाधी नव्हती.कोल्हापुर महानगरपालिका व अनेक शाहूप्रेमी यांच्या प्रयत्नातून १९ जानेवारी २०२२ रोजी छ.शाहू महाराजांच्या समाधीचा लोकार्पण सोहळा झाला.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण २.५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - व्हीनस कॉर्नर - दसरा चौक - नर्सरी बाग येथून स्थानिक लोकांना विचारून पोहचता येईल.
काही महत्वाच्या गोष्टी
१..हे ऐतिहासिक ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.मंदिराच्या बाजूस छ.शिवाजी महाराज व छ.ताराराणी यांचे मंदिर आहे तसेच राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी पाहता येतील.
३.स्मारकाच्या येथे पार्किग सुविधा आहे.
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places



