मसाई पठारावरील पांडवदरा लेणी

मसाई पठारापासून थोड्या अंतरावर प्राचीन पांडवदरा लेणी आहेत.मसाई देवी मंदिरापासून चालत आपण ऐका छोट्या पाण्याच्या टाक्या पर्यंत पोहोचतो.पाण्याच्या टाक्या पासून समोरच्या रस्ताने पुढे गेल्यावर आपल्याला खालच्या बाजूला या लेणी दिसतात.या लेणी पर्यंत जाण्यासठी कुठेही बोर्ड नसल्यामुळे या लेणी लवकर सापडत नाहीत.काही जणांच्या मते या बौद्ध लेणी किंवा 'ब्राह्मणी' पद्धतीची लेणी आहेत असे अभ्यासकांना वाटतात.बौद्ध पंथांपैकी महायान, हीनयान पंथीय लेण्यांमध्ये बुद्धमूर्ती अथवा स्तूप असतो, शिवाय लेण्यांमध्ये बौद्ध भिख्खूंना मुक्कामासाठी विहारामध्ये ओटे तयार केलेले असतात. तर ब्राह्मणी ( शैव व वैष्णव ) लेण्यांमध्ये निवासस्थानांची कमतरता व प्रदक्षिणा पथासाठी (सुरुवातीच्या इ. स. ५०० ते ६०० व्यादरम्यान ) कमी जागा या गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात.सध्या या लेण्यामध्ये भव्य अशी ऐक लेणी आहे.या लेणी मध्ये गारवा जाणवतो तसेच या लेणी मध्ये ऐक देवळी आहे.शेजारी अजून ऐक लेणी असून झाडे असल्यामुळे पटकन दिसून येत नाही.लेणी च्या बाहेर ऐक पाण्याचा स्त्रोत आहे येथील पाणी नितळ असून पाणी पिण्यायोग्य आहे.

कसे जाल ?

कोल्हापूर बस स्थानकापासून मसाई पठारापर्यंत साधारण ३० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

जाण्याचा मार्ग

१.कोल्हापुर - आंबेवाडी - केर्ले - वाघबीळ - बुधवार पेठ - मसाई पठारापासुन चालत मंदिरापर्यंत पोहचावे.मंदिरापासुन 10 मिनिटाच्या अंतरावर लेणी पाहता येतील.
2.कोल्हापुर - आंबेवाडी - केर्ले - वाघबीळ - सोमवार पेठ - म्हळूंगे तर्फे ठाणे - बदेवाडी - मसाई पठार ला थेट रस्ता आहे.

काही महत्वाच्या गोष्टी

१.हे प्राचीन ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.मसाई पठार हे संरक्षक क्षेत्र असल्यामुळे पठारावर कचरा करू नये.
3.जुलै - आँगस्ट महिन्यात या पठारावर अनेक पुष्प वनस्पती पाहता येतील.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Share Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top