सांगशी येथील स्मारकशीला,गगनबावडा

आपल्या लाडक्या राणीच्या स्मरणार्थ एखाद्या राजाने स्थापन केलेल्या शिलालेखाचे किंवा स्मारकाचे एकमेव उदाहरण असलेले हे शिल्प गगनबावडा रोड वर आहे.हे शिल्प रेखीवपणे शेवाळी काळ्या रंगाच्या ग्रॅनाईट दगडात घडवलेले आहे.संपूर्ण शिळेचा आकार सुमारे चार फूट उंच आणि तीन फूट रुंद आहे.शिलालेखाच्या वरच्या बाजूस पेटिकाशीर्षक पद्धतीचा ( Box-headed ) लेख खोदलेला आहे. लेखाच्या खालील बाजूस एका राजस्त्रीच्या अंत्यविधीचे दृश्य ज्वाला, सेविका यांच्यासमवेत दाखवले आहे.संपूर्ण शिल्प हे अतिशय रेखीव,पॉलिश केलेले आहे.लेखाची भाषा संस्कृत असून ती ब्रह्मी लिपीमध्ये लिहिलेली आहे

लेख शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये आहे.अज्ञात कारणांमुळे ही शिला चार तुकड्यांमध्ये दुभंगलेली असून ती नंतर जोडण्यात आली आहे.या शिलालेखावर लिहिलेल्या मजकुराचा भावार्थ असा आहे : ओम श्री पृथ्वीधर राजचिन्ह धारण करणाऱ्या राजाने आपल्या हालिदेवी नावाच्या अभूत अशा चारित्र्यवान पत्नीचे, जी आपल्या पतीचे जणू हृदयच होती - आपले पुण्य नाव रक्षण करीत तरुणपणीच स्वर्गात गेली, तिच्या स्मरणार्थ आपल्या उत्कट 'भावना व्यक्त करण्याकरिता राजाने स्वतः ही स्मारकशिला विधिपूर्वक स्थापन केली.गगनबावडा परिसरात राज्य करणाया चालुक्य वंशातील मंगलेश या रांजाने आपली प्रिय पत्नी हालिदेवी हिच्या स्मरणार्थ स्थापन केलेली स्मारकशिला ही या दाम्पत्याच्या अतूट प्रेमाचे दर्शन आपणाला घडवते.या स्मारकावरील शिलालेख आणि त्यावरील शिल्प यातून त्या काळात स्त्रियांनाही समाजात किती मान दिला जात होता, हे स्पष्ट होते आणि सहाव्या शतकात होऊन गेलेल्या या राजा-राणीच्या दिव्य प्रेमकथेसमोर आपण नतमस्तक होतो.ही स्मारकशिला या गावामध्ये सती सांगसाई म्हणून ओळखतात.तसेच ती गावची रक्षणकर्ती आहे अशी येथील सर्वांची श्रद्धा आहे.

कसे जाल ?

कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण ५५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

जाण्याचा मार्ग

कोल्हापुर - रंकाळा तलाव - बालींगे - आसगाव - साळवन - शेनवडे - असळज - सांगशी येथून स्थानिक लोकांना विचारून पोहचता येईल.

काही महत्वाच्या गोष्टी

१.हे प्राचीन ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.मंदिराच्या येथे पार्किग सुविधा आहे.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Share Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top