कोल्हापूर हुपरी रोड वर पट्टणकोडोली हे गाव लागत.श्री विठ्ठल – बिरदेव मंदिर हे वैष्णव व शिव संप्रदायाचे एकत्रित असे हे मंदिर आहे.गर्भगृहामध्ये श्री विठ्ठल आणि श्री बिरदेव याचे तांदळे आहेत मंदिराच्या बाहेर श्री विठ्ठलाची मानस कन्या भागीरथी देवी गर्भगृह आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापुरचे संत बाळूमामा हे स्वतः श्री विठ्ठल बिरदेवांचे भक्त होते.पट्टणकोडोली गावातील श्री विठ्ठल – बिरदेव हे बाळूमामा कुळदेवता होते.संत बाळूमामाच्या तळावर सर्वात प्रथम श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभल असा गजर केला जातो.यात्रेच्या वेळी फरांडे महाराज जे तलवार हातात घेऊन हेडाम खेळतात ती जोड तलवार आहे.त्यातील एक तलवार ही महालिंग राया (हुलजंती ) आणि दुसरी तलवार हि देवाची आहे
महालींग राया यांची बाबतीत ओवी मधुन एक कथा सांगितले जाते ?
देवांना पट्टण कोडोली मधे यात्रा भरवायची होती त्यांनी त्या साठी भक्त शोधण्यास सुरवात केली.त्यांना माहिती पडलं की हुळजंती येते सलावल दड्डी नावाची महालिंग राया चा धनगर वाडा होता.महालिंग् राया हे खूप मोठे सिद्ध पुरुष होते.देवांनी पहिला यात्रेचा मान त्यांना द्यावा म्हणून देव त्यांचा कडे गेले,यात्रेसाठी मन धरणी केली.माहालिंग राया यात्रेसाठी दूध गंगा नदी पर्यंत आले आणि विठ्ठला ची पत्नी पद्मिनी यांनी भक्त आल्यावर माझ काम आणि वाढणार असे बोल सोमा म्हालदार याला सांगितले.हे महालिंग राया ला अंतर्मनातून समजले आणि ते तिथूनच परत निघाले.देव भेटीसाठी गेले असता महालिंग राया नी ती तलवार देवांना दिली आणि दुसरा भक्त माणदेश मध्ये मिळेल असे सांगितले.आत्ताचे फरांडे महाराज आहेत त्यांचे पूर्वज तेच ते माणदेश मधील भक्त.त्यांना खेलोबा तसेच खेलूभक्त या नावाने ओळखले जाते. त्यांचे मूळ गाव अंजनगाव तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर मध्ये आहे.परत एकदा भक्त शोधण्यासाठी देव बाहेर पडले ते निघून त्या भागात गेले आणि थकल्या मुळे ते एका झाडाखाली झोपले त्यांना ती झोप 2 दिवसाची लागली होती.देवांना आश्चर्य वाटले.देव बोलले इतकी निवांत झोप लागली की माझा भक्त इथेच कुठ तरी आहे.ज्या जागेवर देवांना झोप लागली त्या अंजनगाव ठिकाणी आजही श्री विठ्ठल – बिरदेवाचे मंदिर आहे.तिथे त्यांनी भक्त ठरवला आणि ११ महिने संसार करा आणि एक महिना माझ्यासाठी यात्रा करा असा उपदेश विठ्ठलानी भक्ताला दिला.तेव्हा पासून ही यात्रा भरते आहे.
सध्या फोटोग्राफीचे festival म्हणून न उल्लेख करता श्री विठ्ठल – बिरदेव यात्रा असाच उल्लेख करावा असे मंदिर प्रशासनच्या वतीने सांगण्यात आले आहे तसे न केल्यास मंदिराच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
🛵 कसे जाल ? 🚗
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – उचगाव फाटा – सांगवडे – पट्टणकोडोली