गडहिंग्लज गावातील भडगावगावची गुड्डाई,शेंडूर गावातील रासाई व उत्तूर गावाची जोमकाई देवी या बहिनी आहेत तसेच या मंदिरापासून दोन्ही मंदीरातील ( Air Distance )अंतर समान आहे.मंदिराच्या अजून एक कथा सांगण्यात येते की एका दिवसात जोमकाई देवी, रासाई देवी व गुड्डाई देवीचे दर्शन घेतल्यास सर्व काही मनोकामना पूर्ण होतात.मंदिराच्या आवारामध्ये श्री महादेवाचे मंदिर असून तसेच मंदिराच्या आवारात अनेक तांदळे दिसून येतात.मंदिराच्या आवारामध्ये अनेक झाडे असल्यामुळे येथील वातावरण सुंदर आहे