मुरगूड कागल रोडवर केनवडे हे गाव लागते. केनवडे गावापासून घाट रस्त्यावरसाधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर डोंगरावर श्री भवानी देवीची स्थान आहे.मंदिरामध्ये देवीची मूर्ती चतुर्भुज असून पितळी मुखवट्यावर देवीची आकर्षक पूजा बांधण्यात येते. दिवीचे मंदिर हे प्राचीन आहे.मंदिराच्या बाहेर श्री गणपती त्यांची मूर्ती व श्री महादेव लिंग आहे.
देवीचे मंदिर टेकडीवर असल्यामुळे मंदिरापासून सर्व परिसर दिसून येतो.ग्रामस्थांच्या वतीने मंदिराची नव्याने उभारणी झाली आहे.दर मंगळवार शुक्रवार व नवरात्र या दिवशी अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 35 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – कागल – पिंपळगाव – केनवडे