यात्रा
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात काळभैैरवाची यात्रा असते. महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.यात्रेच्या मुख्य दिवशी श्री काळभैरवाचा सालंकृत अभिषेक होतो.मुरगुड या गावाहून श्री काळभैरवाची पालखी या मंदिरात येते.पालखी मंदिरामध्ये जाऊन पूजा विधी होतो.उत्सव मूर्ती पालखीत बसून गावातील काळभैरवाच्या मंदिराकडे जाते.गावातून पालखी जात असताना प्रत्येक मंदिराच्या इथे पालखी विसावा घेते.श्री काळभैरवाची सासनकाठी गोंडे अर्पन करण्याची पद्धत आहे.अनेक भावीक भक्तीभावाने सासनकाठीला गोंडे बांधतात.संध्याकाळी देवाला गारान घातले जाते.संध्याकाळी श्रींची पुजा उतरल्या नंतर यात्रेची सांगता होते.या यात्रेमध्ये विशेष असा एक प्रसाद मिळतो,स्थानिक भाषेत याला करदंड म्हणतात.यात्रनिमित्त लहान मुलांचे खेळनी व पाळण्यांचे विशेष आकर्षक असते.