गगनबावडा कोल्हापूर पासून 55 किलोमीटर अंतरावर आहे.मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस तसेच सह्याद्रीच्या अनेक डोंगर दर्यांनी व्यापलेला असा हा भाग आहे.करूळ व भुईबावडा असे दोन घाट आहेत.कोकणचे प्रवेशद्वार असेही म्हणतात.गगनबावडा तालुक्यांमध्ये खूप सारी पर्यटन स्थळे व ऐतिहासिक ठिकाणी आहेत त्यामध्ये सांगशी येथील स्मारकशिला,पळसंबा येथील एक पाषाणी मंदिर,बोरबेट येथील मोरजाई देवी व पठार ही ठिकाणे आहेत.गगनबावडा तालूकामध्ये 45 गावांचा समावेश आहे.