कोल्हापूर-देवगड मार्गावर तीन हजार फूट उंचीवरील हे अत्यंत रमणीय असे ठिकाण आहे.येथून कोकणात जाणारा घाटरस्ता फारच विलोभनीय दिसतो.फार पूर्वीपासून सह्याद्रीच्या माथ्यावर असलेल्या मोक्याचे जागेवर तत्कालीन राज्यकर्त्यांनी टेहळणीसाठी नाकी उभारली होती.या किल्ल्याची निर्मिती भोजराजाच्या काळातील असावी.कोकणाकडे जाणारी वाट म्हणून प्राचीन काळापासून याचे महत्त्व आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६६० मध्ये हा किल्ला आदिलशाकडून घेतला.येथे नाथपंथीय लोकांचे देवस्थान असावे.येथे गगनगिरी महाराज यांचे आठ वर्षे वास्तव्य होते.ते मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटणजवळील सणबूर गावचे.ते चालुक्य वंशातील होते.त्यांनी भारतभ्रमण केले होते.बद्रीनाथ येथे त्यांनी नाथपंथाचा अनुग्रह घेतला होता.काही कालावधीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूरच्या जंगलात ते राहिले होते.तेथे त्यांनी योगसाधना केली.तसेच वनौषधींचा अभ्यासही केला.पुढे ते गगनगिरी किल्ल्यावर आले. तेथे त्यांचा मठ आहे.रायगड जिल्ह्यातील खोपोली येथेही त्यांचा पाताळगंगा मठ आहे. तेथेच त्यांचे चार फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.
Related