अमात्य वाडा । Amatya Wada

छत्रपतींच्या अष्टप्रधानांपैकी पंत आमात्य बावडेकरांचा शिवकालीन वाडा हेही एक आकर्षण आहे.गगनबावडयापासून साधारण ९ किमी अंतरावर एक भव्य ऐटबाज हवेली आहे.ही हवेली छत्रपती शाहू महाराजांच्या पंतप्रधानांनी बांधली आहे.त्यांचे उपनाव केळकर होते.या हवेलीमध्ये आल्यावर थंड गारवा, निलगिरीची रांगेनी उभी राहिलेली झाडे आणि नयनरम्य परिसर यांनी मन अतिशय मोहून जाते.या हवेलीमध्ये गतकाळाचे वैभव,मराठयांची शान,यांच्या निशाण्या सतत साद देत राहतात.हवेलीची भव्यता प्रथमदर्शनीच नजरेत भरते.सुरवातीला मोठे पोर्च, लांबलचक पाय-या आहेत.आतल्या दालनांमधील काळोख पचवण्यासाठी एक आंतरिक धीटपणा लागतो.आतल्या भव्य मोठमोठया पण अंधाऱ्या चार खोल्या सोडल्या की वर जाणारा एक उंच पायऱ्यांचा जीना लागतो.या जिन्याने वर पोहोचल्यावर हंडया-झुंबरे असलेला उठ-बस करण्याचा खास दिवाण आहे.त्याची शान, आजूबाजूची झाडे आणि भरपूर मोकळी जागा आहे..या जागी असणाऱ्या दोनही भव्य दिवाणखान्यांना मोठया खिडक्या जशा आहेत,तसेच मोठे व्हरांडे देखील आहेत.एक कोठीची किंवा साठवणीची खोली बाजूलाच आहे.त्या पलीकडे निजायच्या खोल्या लागतात. शिसवी पलंग, जुन्या काळातील घडवंच्या यांनी ह्या खोल्या सजल्या आहेत. या हवेलीच्या आवारात दोन विहिरी आहेत.
          हवेलीच्या चहुबाजूला बागा आहेत.आपला परंपरागत इतिहास, पेशव्यांचा कालखंड, मराठयांचा उदय, सरंजामशाही, शाहू राजांचा कालखंड याच्या अस्तित्त्वाच्या खुणा या हवेलीच्या भव्यतेमध्ये सापडतात. अनेक मराठी मालिका व चित्रपटांचे शुटिंग या हवेलीमध्ये झाले आहे. विविध प्रसंगी, विविध प्रकारे इथल्या जागेचा उपयोग करता येतो. या हवेलीची शान, वैभव, शांत परिसर, झाडी, मागेच डोंगराळ अरण्य यामुळे निर्भरशील दिग्दर्शकांना प्रस्तुत लोकेशनचा वापर करावा असं वाटत राहीलं तर काहीच नवल नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top