रामचंद्र पंत अमात्य बावडेकर वाडा व संग्रहालय
छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. राजाराम महाराज, ताराबाईपुत्र छ. शिवाजी महाराज व राजसबाईपुत्र छ. संभाजी महाराज (कोल्हापूरकर) अशा पाच छत्रपतींच्या काळात प्रधानपदी राहून राज्याची सेवा करणारे सेवेकरी रामचंद्र पंत अमात्य होय.छ शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात रामचंद्रपंत आणि छत्रपती संभाजी यांचे संबंध सलोख्याचे नव्हते. छ. राजाराम महाराजांनी १६९३ साली परत एकदा रामचंद्रपंताना अमात्यपद दिण्यात आले. ते त्यांनी दीर्घकाळ उपभोगिले.छ राजाराम महाराज जेव्हा दक्षिणेतील मराठ्यांचा किल्ला जिंजी येथे आश्रयार्थ गेले,तेव्हा मोगलव्याप्त अशा स्वराज्याच्या मुलूखाचे संरक्षण सरसेनापती संताजी घोरपडे आणि सरसेनापती धनाजी जाधव यांच्या साहाय्याने रामचंद्रपंत अमात्यांनी केले.छ राजाराम महाराजांनी पंताना ‘हुकुमतपन्हा’ हा किताब दिला होता.मराठी राज्यावर कोसळलेले मोगलाचे अरिष्ट टाळण्याची महत्वपूर्ण कामगिरी रामचंद्र पंतानी बजावली.छ शिवाजी महाराजांच्या राजनीतीवरील आज्ञापत्र हा महत्वाचा ग्रंथ रामचंद्र अमात्य यांनी लिहिला.


काय पाहाल
गेटमधून प्रवेश केल्यानंतर भव्य असा वाडा आपल्याला पाहायला मिळेल.वाड्याच्या बाहेर सुंदर कारंजा नजरेस पडतो तसेच जुनी तोफ व अनेक विरगळी,पडझड झालेल्या दगडी शिळा पाहायला मिळतात. संग्रहालयामध्ये प्रवेश केल्यानंतर पंत अमात्य बावडेकर यांचा फोटो व इतिहास यांची माहिती मिळते. तसेच बावडा जहागिराची माहिती,त्यांच्या काळातील भांडी,वाड्याचं बांधकाम चालू असतानाचे फोटो, तलवारी, भाले, झुंबर, तोफा, शूटिंग झालेल्या चित्रपटांचे पोस्टर, मराठेशाहीच्या पगड्या, सारीपाटाचा डाव, भातुकलीचा खेळ, बुद्धिबळाच्या सोंगट्या, करवीर रियासत मधील संस्थानिकांच्या मुद्रा आणि व अनेक वस्तू पाहण्यासारख्या आहेत.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
काही महत्वाच्या गोष्टी
संग्रहालयाची वेळ
सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30
प्रवेश शुल्क - 30 ₹
संग्रहालयात पार्किग सुविधा आहे.
( संग्रहालयात फोटो घेण्याची परवानगी नाही )
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places



