सुमारे चारशे वर्षांपूर्वी गोवा राज्यातून घाट माथ्यावर वसलेला ख्रिस्ती समाज कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड,गडहिंग्लज,भुदरगड,राधानगरी व कागल या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये आपल्या व्यावसायिक अनुकूलतेनुसार विस्थापित झाला.शेती,मासळी व्यापार व शेतमजुरी हे अर्थार्जनाचे प्रमुख साधन होते.त्या काळी आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच होती.शेणगाव, दोनवडे कडगाव,तांबाळे,गावठाण,बाचणी व मुरगूड या सात गावांतील (वाडे) ख्रिस्ती लोकांनी एकत्रित येऊन गावठाण येथे पन्नास वर्षांपूर्वी मिलाग्रीस चर्चची स्थापना केली.या चर्चच्या स्थापनेनंतर दर आठवड्याला प्रार्थना सभा (मिस्सा) होत असे.लांबच्या पल्ल्यामुळे सर्वांना मिस्साला जाणे शक्य नसल्याने महिन्यातून एकदा प्रत्येक वाड्यातील एकाच्या घरी मिस्सा केला जात असे.

चर्च उभारणीचा इतिहास

धर्मगुरुची व्यवस्था येथील प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब आपल्या परीने करीत असत.पुढे काही काळाने आपली स्वतंत्र गोणगाव वाड्यामध्ये हा मिस्सा येथील मुख्य घर समजल्या जाणाऱ्या मांडावर होत असे.मिस्सासाठी येणाऱ्या असावी, हा विचार पुढे आला.

आर्थिक निधी जमविण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक व तरुणांच्या सहमताने शेणगाव वाडेकरांनी भिशी योजना सुरू केली.प्रत्येक ख्रिस्ती समाजाने स्वेच्छेने देणगी रूपाने काही रक्कम फंडास देणे.तसेच विवाह प्रसंगी नवदांपत्याकडून देणगी रूपाने काही रक्कम फंडास घेणे.तसेच विवाह प्रसंगी मुलांच्या बाप्तिस्म्या निमित्ताने आई-वडिलांकडून वर्गणी वार्षिक जोडीपट्टी म्हणून प्रत्येक दांपत्याकडून पाच रुपये देणगी स्वीकारली जाई.

 

काही महिन्यांनी ही सर्व रक्कम एकत्र करून त्याचा फंड तयार केला व सर्व रक्कम एखाद्या गरजू व्यापारी किंवा गतकल्यास व्याजावर एक वर्षाकरिता दिली जाई.दरवर्षी गुड फ्रायडेच्या दिवशी ही रक्कम व्याजासह परत वसूल केली जाई.चाळीस हजाराच्या आसपास भिशी फंड जमा झाल्यानंतर भिशी पद्धत बंद करण्यात आली.चर्च बांधण्यासाठी श्री. किस्तोबा लॉरेन्स बारदेस्कर यांचे वडील ख्रि. श्री. लॉरेन्स म्हातू बारदेस्कर यांनी आपली दोन एकर शेतजमीन उदार हस्ते दान केली.शेणगावच्या माळरानावर असलेल्या या जमिनीच्या मध्यभागी फातिमा चर्चची भव्य डौलदार इमारत एक वर्षाच्या आत वाड्यातील सर्व लहान-थोर स्त्री-पुरुषांनी स्वमेहनतीने उभारली.सन १९५३-५५ च्या दरम्यान शेणगाव येथे या फातिमा चर्चचा उद्घाटन सोहळा त्या काळातील धर्मप्रांताचे बिशप आंद्र डिमोलो यांच्या हस्ते करण्यात आला.त्याचबरोबर यावेळी मुंबईहून आणलेल्या फातिमा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा त्यांच्यात हस्ते करण्यात आली.

संदर्भ – भुदरगड पर्यटनाच्या पाऊलवाटा

 

🛵 कसे जाल ? 🚗

कोल्हापूर पासुन अंतर – 58 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – कळंबा – इस्पुर्ली – आदमापूर – शेणगाव – फातिमा चर्च 
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top