पन्हाळा तालुका हा सह्याद्रिच्या डोंगरांमध्ये वेढलेला आहे.ऐतिहासीक पन्हाळा दुर्ग व पावनगड हा या तालुक्यामध्ये येतो,तसेच नाथ केदार म्हणजेच कोल्हापुर चे आराध्य दैवत श्री जोतिबाचे स्थान हे या ठिकानी वाडी रत्नागिरी वर आहे.तसेच मसाई पठार,विर शिवा काशिद स्मारक,पैजारवाडी,पोहाळे लेणी ही ऐतिहासिक स्मारके व पर्यटन स्थळे हि या तालुक्यामध्ये आहेत.पन्हाळा तालुक्यातुन कोल्हापूरी – रत्नागिरी हा महामार्ग जातो.पन्हाळा तालुका मध्ये 129 गावांचा समावेश आहे.