कोल्हापूर पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर पन्हाळा किल्ला आहे.बस स्थानकापासून थोड्याच अंतरावर श्री अंबाबाई देवीचे मंदिर आहे.श्री अंबाबाई व ब्रम्हेश्वर मंदिराची बांधनी पाहुन ही मंदिरे प्राचिन आहेत याची अनुभूती येते.डाव्या बाजूच्या मंदिरात श्री ब्रह्मेश्वराचे लिंगरूप आहे.उजव्या बाजूस श्री अंबाबाई चे मंदिर आहे.
देवीची मूर्ती चतुर्भज असुन साधारण दोन ते अडीच फूट उंच आहे.देवीच्या हातामध्ये अनुक्रमे म्हाळुंग गदा ढाल व पानपात्र आहे.माथ्यावर पाचमुखी नाग आहे.शारदिय नवरात्र उत्सवामध्ये अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.श्री महालक्ष्मी ही शिलाहार राजा भोज यांची कुलदेवता होती.शिलाहार कालिन हेच मंदिर असावे या संशोधन होने गरजेचे आहे.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – २२ किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – आंबेवाडी – कळे – वाघबीळ – पन्हाळगड