कोल्हापूर शहरापासुन साधारन 50 किलोमीटर अंतरावर 32 शिराळा हे गाव आहे.पुर्वी गावाचे नाव श्रियाळ किंवा श्रीयालय होते याचे उल्लेख करवीरमहात्म्य या ग्रंथामध्ये मिळतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिराळ्याच्या परिसरातील 32 खेड्यांचा महसूल जमा केला जात असे म्हणून शिराळा गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले असे स्थानिक सांगतात.
प्राचिन प्राचीन काळी गरुडाच्या भयाने श्री नाग करवीर निवासनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आले होते.तेव्हा देवीने सांगितले करवीर क्षेत्राच्या उत्तरेस तीन योजनेवर एक शिळा आहे त्या ठिकाणी तुम्ही रहा तुमच्या नावाने हे गाव प्रसिद्ध होईल.श्रावण शुद्ध पंचमी – नागपंचमीस लोक तुमची पुजा करतील.देवीने महिषासुराला मारला तेव्हा देवीच्या गळ्यातील वैजयंती माळेतील एक मणी ज्या ठिकाणी पडला तेथे वैजेश्वर नावाचे लिंग आहे.देवीने सात दिवस वास्तव्य केले होते म्हणून यो स्थान श्रियाल ( शिराळे ) या नावाने प्रसिद्ध झाले याचे उल्लेख करवीर महात्म्य १३ व १४ अध्यायात येतो.
गावामध्ये प्राचिन अस श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे.देवीची मूर्ती खडी आहे.या मंदीरामध्ये नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.मंदिराची नव्याने बांधणी करण्यात आली आहे.मंदिराच्या शिखरावर नाग आहे.मंदिरामध्ये नागाची शिळा आहे मध्यभागी शिवलिंग आहे तसेच श्री गणेश मारूती यांची शिल्पे आहेत.मंदिराबाहेर सुंदर दिपमाळ आहे.गावामध्ये गोरक्षनाथांचे मंदिर आहे.नागपंचमी तसेच शारदिय नवरात्र उत्सवामध्ये अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 50 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – शिरोली – किणी – तांदूळवाडी – ३२ शिराळा