महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वत रांगा आहेत आणि याच परिसरात आपल्याला सर्वाधिक दुर्ग पाहायला मिळतात. जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येईल वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येईल अशा नैसर्गिक किंवा नवीन बांधकाम करून दुर्गम ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते यालाच किल्ला किंवा दुर्ग किंवा गडकोट म्हणतात.अनेक ठिकाणी घाटमाथ्यावर दुर्गबांधणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल.किल्ल्याच्या बांधनी स्थानावरून त्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.किल्ल्याचे तीन प्रकार आहेत.पहिला गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरावर बांधलेले किल्ले.जलदुर्ग म्हणजेच समुद्रामध्ये बेटांवर बांधण्यात आलेले किल्ले आणि भुईकोट म्हणजेच सपाट जमिनीवर वर बांधण्यात आलेले किल्ले.