26 सप्टेंबर 2022 सर्व देवी भक्तांसाठी एक आनंदाचा दिव.स घटस्थापना हे निमित्त तर आहेच पण आज आपल्या सगळ्यांच्या आनंदाचे कारण असणारी इतकच नव्हे तर या करवीर नगरीचे हे वैभव आपण जिच्या छत्रछायेखाली अनुभवतोय त्या करवीर निवासीनीच्या मूर्तीला पुन्हा सिंहासनावर बसून आज तीनशे सात वर्षे पूर्ण होतात 26 सप्टेंबर 1715 सोमवार आणि विजयादशमी हा तो दिवस योगायोगाने आजही सोमवारच आहे फक्त विजयादशमी ऐवजी आज अश्विन शुक्ल प्रतिपदा अवांतराच्या भयास्तव श्रींची मूर्ती पुजारी यांचे घरी लपवून ठेवण्यात आली होती ती पुन्हा सिंहासनावर बसवावी असा दृष्टांत नरहरभट सावगावकरांना झाला त्यांनी तो दृष्टांत पन्हाळा मुक्कामी श्री छत्रपती महाराजांना विधीत केला तेव्हा छत्रपती महाराजांच्या आज्ञेवरून शिदोजी घोरपडे सरकार नरहरभट सावगावकर आणि तत्कालीन श्री पूजक यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई च्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा केली.

या गोष्टीला आज तीनशे सात वर्षे पूर्ण होतात काळ जसा अनादि अनंत तशी जगदंबा ही अनंत आहे केवळ मूर्ती हे जरी तिचं स्वरूप नसलं तरी सुद्धा याच मूर्तीच्या रूपान ती आपल्यावरती कृपा करते याची जाणीव आपल्याला होत असते. या दिवसाचं स्मरण अशासाठी ठेवायचं की छत्रपतींच्या आज्ञेने आपले देव पुन्हा प्रतिष्ठित झाले एकंदर देवांना सुद्धा आपल्या राज्य वाटावं असं स्वराज्य श्री शिवछत्रपती महाराजांनी निर्माण केलं आणि त्या पुढच्या छत्रपतींनी ते अगदी जीवापाड जपलं या सगळ्या इतिहास पुरुषांच कर्तृत्व म्हणून आणि जगदंबेची कृपा म्हणून आज आपण हा सोन्याचा दिवस बघतो आहोत तेव्हा या नवरात्र प्रतिपदेला जगदंबे बरोबरच या सर्व इतिहास पुरुषांना मानाचा मुजरा
श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top