रांगणाई देवीचे मंदिर कौलारू असुन प्रशस्त आहे.देवीची मुर्ती साधारन दोन फुट उंच असुन अनुक्रमे हातामध्ये त्रिशुल,तलवार,ढाल व पाणपात्र आहे.रांगणाईच्या उजव्या बाजूस श्री विष्णूची मुर्ती व डाव्या हाताला भैरवाची मूर्ती आहे.या ठिकाणी एक फारसी शिलालेखाचा दगड आहे.मंदिरासमोरच भव्य दीपमाळ आहे.देवीच्या उत्सवावेळी याठिकाणी दिले लावले जातात.अनेक भाविक या मंदिरात मुक्काम करतात.या गडावर अनेक वास्तूची पडझड झालेली आहे.कोकन दरवाजा मधून सह्याद्रिचे विराट रूप पहायला मिळते.हा गड पुर्ण पहायचा असल्यास साधारन एक दिवस पुर्ण जातो.असा हा रांगणा किल्ला व रांगणाई दिवीचे प्राचिन स्थानाला अवश्य भेट द्या व येथील परिसर सुशोभीत ठेवा हि विनंती.