राधानगरी तालुका
राधानगरी हा तालुका कोल्हापूर पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.राधानगरी धरणाच्या पायथ्याशी आणि भोगावती नदी काठावर हे ठिकाण आहे.चारी बाजूने डोंगरांंनी वेढलेले राधानगरी अभयारण्य आणि काळम्मावाडी,तुळशी या तीन प्रकल्पामुळे त्याची ओळख वेगळी आहे.वन्यजीव आणि जैवविविधतेने तालुक्याचा बराच भाग व्यापलेला आहे,तसेच अनेक धबधबे आपल्याला या तालुक्यांमध्ये पाहायला मिळतात.चक्रेश्वराचे प्राचिन मंदिर हेही याच तालुक्यांमध्ये येते. जंगल सफारी व अनेक प्राण्यांचा सहवास असलेल प्रसिद्ध असे दाजीपूर अभयारण्य हे राधानगरी पासुन जवळ आहे.राधानगरी तालुक्यांमध्ये 114 गावांचा समावेश आहे.