फोंडा घाट प्राचिन घाट आहे.1820 च्या सुमारास इंग्रजांची तोफखान्याची एक तुकडी व लष्कर या घाटमार्गाने सांवतवाडीला गेले होते यांची नोंद कोल्हापूर गँझेटिअर मध्ये येतो.
राधानगरी गावापासून फोंडा घाटाचे अंतर साधारण ४५ किलोमीटर आहे.फोंडा गावापासून सुरू होणारा हा घाट दाजीपूर पर्यंत पसरला आहे.दाजीपूरला गवा अभयारण्य आहे..कोल्हापूरहून राधानगरी मार्गे फोंडा घाट येतो.घाट उतरताच फोंडा गाव लागते.फोंडा गावाच्या नावावरून या घाटाला फोंडा फोंडाघाट असे म्हणतात.फोंडा गाव हे नैसिर्गिक वनस्पतींनी वेढलेले आहे.अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती येथे आहेत.गावातूनच मुख्य रस्ता जातो.