कोल्हापूरपासून ८० कि.मी.वर असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यात आढळणारे पक्षीविश्व, प्राणीसंपदा, औषधी वनस्पती, तसेच फुलपाखरे इथल्या संपन्न जैवविविधतेचे दर्शन घडवते. पर्यटकांना दाजीपूर अभयारण्याबरोबरच आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे अभयारण्याची ओळख करून देणारे माहिती केंद्र, टेहाळणी मनोरे त्याच बरोबर शिवगड, हत्तीमहाल येथील साठमारी, राधानगरी धरणाच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेला बेंझील व्हिला, उगवाई देवराई, हसणे देवराई आणि राधानगरी येथे नव्याने सुरू केलेले फुलपाखरू उद्यान हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे