दुर्ग म्हणजे शिवरायांच्या दुर्ग नीतीचा तेजस्वी अविष्कार,दुर्ग म्हणजे संरक्षण स्थापत्याचा उत्तम साक्षीदार. दुर्ग संरक्षण आणि बांधणीविषयी रामचंद्र पंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात म्हणले आहे
“राज्यरक्षणाचें मुख्य कारण किल्ले देशोदेशी स्थळे पाहून बांधावे.किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी असो नये.कदाचित असला तरी सुरूंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा.सुरूंगास असाध्य असा असला तरी तोहि जागा मोकळी न सोडिता बांधून मजबूत करावा.”
या दुर्गबांधणीच्या तत्त्वानुसार बांधलेला दूर्ग म्हणजे पन्हाळाचा जोडकिल्ला किल्ले पावनगड होय.पावनगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे बुधवार पेठेतून व दुसरा मार्ग आहे रेडेघाटीचा मार्ग.ज्या डोंगरावर पावनगड वसलेला आहे त्या डोंगराला मार्कडेय डोंगर असे म्हणतात.पावनगडावर औषधी वनस्पती पन आढळुन येतात.गडावर आपल्याला तुपाची विहीर पाहायला मिळते.या तुपाच्या विहीरीचा वापर त्यावेळी जखमेवर तुप लावण्यासाठी वापर केला जात असे.तुपाच्या विहिरीच्या पाठीमागे आपल्याला विहीर पहायला मिळते.पावनगडावर आपल्याला मंदीर पाहायला मिळते.त्या मंदिरात आता शिवलिंग आढळुन येते.साधारण 1673 च्या आसपास पन्हाळागड जिंकल्यानंतर शिवरायांनी हा गड पूर्णता नव्याने बांधून घेतला.अर्जोजी यादव आणि हिरोजी फर्जद यांनी शिवरायांच्या आज्ञेने हा दूर्ग बांधला असे उल्लेख उपलब्ध आहेत. दुर्ग बांधणीसाठी दोघांनाही महाराजांनी पाच – पाच हजार होन बक्षीस दिले होते.