करवीर क्षेत्राला दक्षिण काशी म्हणले जाते.कोल्हापूर पासुन साधारन 30 किलोमीटर अंतरावर आरळे गाव आहे.या गावाला प्राचिन वारसा लाभला आहे.आरळे गावची ग्रामदेवता कामाख्या देवी.कामाख्या देवीचे पुर्वीचे नाव कामाबाई होते.साधारन 2000 साली आसाममधून काही अभ्यासक करवीर क्षेत्री श्री कामाख्या देवीचा शोध घेण्यासाठी आले होते त्यांनी आरळे गावामध्ये कामाख्या देवीचे एखादे मंदिर असावे असे सांगितले.पन्हाळा तालुक्यामध्ये आरळे गाव आहे परंतू या गावामध्ये भैरवाची मुर्ती आहे.करवीर तालुक्यामध्ये आरळे हे गाव आढळूून आले.या गावामध्ये देवीचे मंदिर सापडले परंतू या मंदिराचे नाव अंबाबाई महालक्ष्मी असे होते
Previous
Next
आसाम मध्ये कामाख्या देवीची पूजा ही योनी शिल्पामध्ये होते तसे शिल्प इथे सापडले नाही.मंदिरांची पाहणी करताना मंदिराच्या जुन्या घंटा निदर्शनास आल्या या घंटेवर कामाबाई देवी श्री कामाख्या देवी अर्पण अशा नोंदी दिसून आल्या तसेच मंदिराच्या बाहेर एका ठिकाणी योनी शिल्प निदर्शनास आले व गावातील जुन्या मंडळींकडून ओव्या च्या माध्यमातून हे कामाख्या देवी आहे हे स्पष्ट झाले.मंदिर व मुर्ती अभ्यासक श्री उमाकांत राणिंगा व प्रसन्न मालेकर यांच्या अथक प्रयत्नातून हे संशोधन झाले यानंतर गावातील ग्रामस्थांच्या मदतीने नव्याने देवीची व मंदिराच्या बाहेर एक छोटे मंदिर बांधून तिथे देवीच्या योनी शिल्पाची स्थापना केेेली आहे.तेव्हापासुन देवीची पुजा ही शास्त्रोक्त पद्धतीने सुरू झाली.देवीचे योनी शिल्प कायम कापडाने झाकून ठेवले जाते.देवीची भैरव हा शेजारीच गर्जन गावामध्ये आपल्याला पहायला मिळतो.श्री भैरवाचे स्वतंत्र मंदिर आहे.
श्री कामाख्या देवीची मुर्ती चतुर्भुज आहे.साधारण दीड ते दोन फूट देवीची उंची आहे.सध्या देवीची पुजा पितळी मुखवट्यावर बांधली जाते.मंदिराच्या बाहेरच्या बाजूस श्री महादेवाचे स्थान आहे.अनेक विरगळी मंदिरांच्या आवारात पाहता येतील.गावामध्ये कामाख्या मंदिराबरोबर गावाच्या चौकात एक मंदिर आहे या मंदिरात श्री हनुमान,विठ्ठल – रुक्मिणी,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती आहेत.आसाम मधील कामाख्या मंदिराप्रमाणे उत्सव साजरे केले जातात.नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवात साजरे केला जातो.दर मंगळवारी व शुक्रवारी या मंदिरात भावीक येत असतात.करवीर क्षेत्री असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवावा ही विनंती.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 28 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – बालिंगे – कोगे – कसबा बीड – शिरोली – गर्जन – आरळे