कोल्हापूर पासुन आंबा घाटाचे अंतर 70 किलोमीटर आहे. पूर्वी कोकण ते कोल्हापूर पर्यंत पक्का रस्ता नव्हता ब्रिटिश काळामध्ये आंबा गावातील एका मेंढपाळांनी हा रस्ता ब्रिटिश अभियंता ला दाखवला त्यानंतर तो घाट झाला, या घाटाला आंबाघाट असे नाव देण्यात आले. घाटामध्ये उजव्या बाजूला एक छोटे मंदिर आहे या मंदिरामध्ये गाय मूख आहे,गाय मुखावर श्री गणेशाची सुंदरशी संगमरवरी मूर्ती आहे.गायमुखातून पाण्याचा संततधार सुरू असतो.आंबा घाटाच्या अलीकडे मानोली हे गाव लागते मानोली पासून विशाळगड वीस किलोमीटर अंतरावर आहे तर आंबा घाटातून आपल्याला मार्लेश्वर रत्नागिरी या ठिकाणी जाता येते.पावसाळ्यामध्ये येथील वातावरण आल्हाददायक असते.पावसाळा व हिवाळा मध्ये सकाळच्या वेळी भरपुर धुके असतात.मानोली या गावांमध्ये तसेच घाटाच्या अलीकडे आपल्याला खूप रिसॉर्ट पाहायला मिळतात.पश्चिम घाटामध्ये कोल्हापूर - रत्नागिरी हा जिल्हा या घाटा द्वारे जोडला जातो.