आसळजपासून अगदी जवळच रामलिंगची एकपाषाणी मंदिरे आहेत.रामलिंगच्या डोंगरावरून वाहत येणाऱ्या ओढ्यामध्ये एकाच खडकात कोरून काढलेली तीन मंदिरे उभी आहेत.ध्यानमंदिर,यज्ञमंदिर व उपासनामंदिर अशी ही मंदिरे असावीत,असे तज्ज्ञांचे मत आहे.अगदी सुरुवातीलाच दिसणारे,थोडेसे कललेले उपासना मंदिर असावे.त्यामागे काही अंतरावर चार बाजूला खुले असलेले मंदिर आहे,ते यज्ञमंदिर असावे.कारण यज्ञाचा धूर बाहेर जावा,यासाठी चारही बाजू खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.या मंदिराच्या जरा पुढे ध्यानमंदिर आहे.बाहेरच्या बाजूला छोटी ओवरी असून आत एक छोटी खोली असून ध्यानाला बसण्यासाठी कट्टा खोदलेला आहे.ही मंदिरे ओढयाच्या ऐन प्रवाहात खोदलेली असल्याने पावसाळ्यात तेथे -पोचणे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे केवळ अशक्य असते. मात्र पावसाळा व नंतरचे एकदोन महिने सोडले तर खडकांवर चढून ही मंदिरे पाहता येतात,यापैकी एकाही मंदिरात मूर्ती नाही.या लेण्यामध्ये सुरवातीच्या ठिकाणी १८ देवकोष्ठे आहेत या यामध्ये अनेक शिवलिंगे आहेत.या लेण्यामध्ये एके ठिकाणी शिवलिंग स्थापन केले आहे.स्थानिक लोक याला रामलिंग म्हणतात.या शिवलिंगावर ओढ्यामधील पाण्याचा संततधार होत असतो.गगनगिरी महाराज या ठिकाणी साधनेसाठी येत असत.
Previous
Next
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - रंकाळा तलाव - बालींगे - आसगाव - साळवन - शेनवडे - असळज येथून स्थानिक लोकांना विचारून पोहचता येईल.
काही महत्वाच्या गोष्टी
१.हे प्राचीन ठिकाण आहे रामलिंगच्या शेजारी मठ आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
2.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती.
३.मंदिराच्या येथे पार्किग सुविधा आहे.