तुळशी नदीच्या काठावर वसलेले कांचनवाडी हे गाव निसर्गरम्य आहे.गावाची ग्रामदेवता श्री कामाक्षी देवी आहे.श्री कामाक्षी देवी चे स्थान हे डोंगर माथ्यावर आहे.डोंगरमाथ्यावर गर्द वडाच्या झाडीमध्ये देवीचे मंदिर आहे.पुर्वी मंदिरे हे छोटे होते काही वर्षापुर्वी कांचनवाडी ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतून देवीचे भव्य मंदिर बांधले आहे व आजबाजूचा परिसर सुशोभित केला आहे.कांचनवाडीचे श्री कामाक्षी देवीची तांदळा स्वरूपात पुजा केली जायची,काही वर्षापुर्वी ग्रामस्थांच्या वतीने देवीची मुर्ती घडवलेली आहे.कामाक्षी देवीचे मुळ स्थान हे तामीळनाडू येथील कांचीपुरम या ठिकाणी आहे.
Previous
Next
सध्या मंदिरामध्ये देवीच्या तांदळाच्या मागे देवीची मुर्ती आहे साधारन 2 ते 2.5 फुट देवीची उंची आहे देवीची मुर्ती चतुर्भज असुन हातामध्ये उसाचे धनुष्य,पाश,अंकूश व फुलाचे बाण आहेत.देवीची मुर्ती रेखीव व सुंदर आहे.मुर्तीच्या खाली एक पाषाण आहे यामध्ये कोरीव काम केलेले आहे तसेच काही शिलालेख असावा पाषाणाची झिज झाल्यामुळे येथील पाषाणाचे वाचन करता येत नाही.मंदिरांच्या पाठीमागच्या बाजूस मरगुबाई व एकेरी या देवींचे तांदळे आहेत.
ग्रामस्थांच्या वतीने एक दंतकथा सांगितले जाते की पुराणकाळात कामाक्षी देवीची एका महिलेकडून नित्य भक्ती होत असत त्यावेळी देवी तिला प्रसन्न झाली पुढे उतारवयात महिलेला देवीची भेट घेणे कष्टप्रद झाल्याने तिने देवीस माझ्या घरी येऊन राहा असे सांगितले देवीने भक्तांच्या हाकेला मान देऊन तिच्या घरी कायमची वास्तव ठेवले.दरम्यानच्या काळात गावांमध्ये चोरांनी चोरीच्या उद्देशाने मध्यरात्री प्रवेश केला होता त्यावेळी देवीने गावच्या रक्षणासाठी चोरांना पिटाळून लावत चोराच्या दिशेने एक भले मोठे दगडी मुसळ भिरकावले होते हे मुसळ (शिळा) आजही गावाबाहेर पहायला मिळते.
दसऱ्याला नवरात्र उत्सवामध्ये देवीचा उपवास करण्याची संख्या खूप मोठी आहे दरवर्षी यात भर पडते. नवरात्र उत्सवात अनेक भाविक येथे मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरात येत असतात यामुळे येथील देवीची पालखी सोहळा भव्य असतो.दर मंगळवारी व शुक्रवारी या मंदिरात भावीक येत असतात.करवीर क्षेत्री असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवावा ही विनंती.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 30 किलोमीटर
जाण्याचा मार्ग 1 – कोल्हापूर – बालिंगे – कोगे – कसबा बीड – शिरोली – गर्जन –
जाण्याचा मार्ग 2 – कोल्हापूर – वाडीपीर – हळदी – सडोली खालसा – पाटेकरवाडी – कांचनवाडी