शाहुवाडी तालुका हा नैसर्गिकरीत्या खूप सुंदर आहे,आजुबाजुला घनदाट जंगल,सह्याद्रीच्या रांगा यामुळे येथील परिसर निसर्गरम्य आहे.शाहुवाडी तालुक्यामध्ये प्रसिद्ध अस येळवण जुगाई देवीचे मंदिर आहे.मंदिरामध्ये कडे जाताना आपल्याला नव्याने उभारलेली स्वागत कमान दिसेल.स्वागत कमानी मधून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला एका चौथऱ्यावर पाच ते सहा देवतांचे तांदळे दिसतील,डाव्या बाजूला पुढे गेल्यावर सुंदर असे नव्याने बांधलेल महादेवाचे मंदिर आहे.मंदिराच्या शिखरावर 5 मुखी नाग व शिवलिंग आहे तर मुख्य गाभाऱ्यामध्ये महादेवाचे लिंग आहे.शिवलिंगाच्या शेजारी नंदी आहे.महादेवाचे मंदिराचे दर्शन केल्यानंतर आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो,मंदिराला प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत. मंदिरामध्ये दगडी नक्षीदार कमानी आहेत.मुख्य मंदिराच्या गाभारा आहे तसाच ठेवून नवीन मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
Previous
Next
मंदिराचे शिखर हे खूप सुंदर आहे.आजूबाजूला जंगल असल्यामुळे बाहेरून मंदिराचा परिसर खूप सुंदर दिसतो.पावसाळ्यामध्ये हे मंदिर अधिकच खुलून दिसते.जुगाईची मूर्ती ही चतुर्भुज असूर्मर्दिनी असून देवीच्या उजव्या हातात तलवार शुल तर डाव्या हातात असुर शिर व ढाल दिसून येते मूर्तीची उंची साधारण दीड ते दोन फूट पाषाणामध्ये आहे.देवीच्या शेजारीच देवीची पितळेची उत्सव मूर्ती आहे.देवीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळ आहे.देवीचे शेजारी पितळेचे तीन टाक आहेत.देवीला खण व नारळ याची ओटी दिली जाते.मुख्य मंदिराच्या प्रदक्षिना मध्ये साधारण दीड फुटी उंचीच्या पाच ते सहा मुर्ती आहेत.भग्न झाल्यामुळे या मुर्त्यांची वैशिष्टे कळत नाहीत.जुगाई देवीची एक कथा सांगितले जाते कोकणातून जोगेश्वरी देवी ज्यावेळी अंबेजोगाई जात असते त्यावेळी वेळूच्या बनात विश्रांतीसाठी थांबते.हे वेळूचे बन म्हणजेच सध्या असलेली यळवन जुगाई देवी.पौर्णिमेला देवीचा मोठा उत्सव असतो जोतिबाची पालखी जेव्हा सदरेवर विराजमान होते तेव्हा रात्री 12 वाजता जुगाई देवी छबिण्याला निघते.तेव्हा सोणूर्ले मान व इतर गावातील सासनकाठी पालखी समोर नाचवत मान मिरवत असतात.ह्या सासन काठ्या आपल्या गावी परतल्यावर त्या गावी परत देवीची यात्रा भरवून प्रसाद वाटप करत असतात.अनेक ब्राह्मण कुटूंबीय अंबेजोगाई योगेश्वरी जाता येत नसेल तर येळवन जुगाई ला जाऊन मनोभावे दर्शन घेऊन येतात.
मुख्य मंदिराच्या शेजारीच आपल्याला बारव पाहायला मिळेल.बारव म्हणजेच पाण्याचे कुंड म्हणता येईल किंवा विहिर.या कुंडामध्ये नैसर्गिक पाणी येते.या पाण्याची चव काही वेगळीच असते.या बारवामध्ये नितळ पाणी आहे यामुळे येथील माशांचे दर्शन होते.बारव मध्ये दोन छोट्या मूर्ती व शिवलिंग आहे बारावच्या भोवती अनेक देवतांच्या मूर्ती आहेत,यामध्ये गणेशाची एक सुंदर मूर्ती आहे व इतर देवता आहेत.बारव चा आकार शिवलिंगासारखा आहे शेजारी तुळशी वृंदावन आहे.मंदिराच्या समोर दीप माळ आहे.जांभा खडकांमध्ये कोरलेली ही दीपमाळ आकर्षक वाटते.जुगाई देवी ची यात्रा चैत्र पौर्णिमेला असते यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येथे दाखल होतात.मंदिराच्या परिसरामध्ये पार्किंगसाठी जागा आहे.शाहूवाडी परिसरात असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवावा ही विनंती.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 64 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – आंबेवाडी – केर्ले – बांबवडे – शाहूवाडी – मान – पांढरेपाणी – यळवन