करवीर निवासनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई च्या परिसरामध्ये अनेक मंदिरे आपल्याला पहायला मिळतात.यामध्ये श्री कपिलतीर्थ मार्केटमधील श्री कपिलेश्वर,काशी विश्वेश्वर,श्री जोतिबा मंदिर,श्री भवानी मंडप येथील श्री तुळजाभवानी मंदिर,रंकभैरव व बिनखांबी गणेश मंदिर.गणेश विसर्जन मिरवणूकीचा केंद्रबिंदू असलेले हे ठिकाण आहे.या मंदिराच्या नावाला एक महत्व आहे.या मंदिरामध्ये आपल्याला खांब आढळून येत नाहीत.या मंदिराची बांधणी करताना एक ही खांबाचा वापर केला नाही आहे.म्हणून या मंदिराला बिनखांबी गणेश मंदिर म्हणले जाते.मंदिराची छताची बांधणी ही मध्यभागी की-स्टोन किंवा वास्तुविशारदांच्या भाषेत सांगायचे झाले तर आयकाँन आहे.त्या आधारे मंदिराच्या छताचे बांधकाम झाले आहे.कोल्हापुरातील अनेक पुरातन वास्तू अशाच कि-स्टोन वर आधारीत आहेत.
पूर्वी ज्या ठिकाणी हे मंदिर आहे त्याच्या पाठीमागे जोशीरावांचा वाडा आहे.या वाड्याच्या विहिरीची डागडुजी करताना व गाळ काढताना येथे गणेशमूर्ती मिळाली ती मूर्ती जोषीरावांनी विहिरीच्या काठावर ठेवली होती.या भव्य अशी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना श्री बिनखांबी गणेश मंदिरात करावी अशी नागरिकांनी जोशी रावांना विनंती केली व तत्कालीन छत्रपतींनी 1870 च्या कालावधीत या मुर्तीची प्रतिष्ठापणा केली.या गणपतीला जोशीराव गणपती म्हणूनही ओळखले जाते.आजही मूळ लहान मूर्ती मंदिरामध्ये आहे सध्याच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस श्री गणेशाची मूर्ती आहे.
कोल्हापुरातील सर्व गणेश मंदिराची माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल
सध्याची मुख्य मूर्ती साधारण साडेतीन फूट असून चतुर्भुज आहे.मूर्ती ही शेंदूराने रंगवलेली आहे.मुख्य गाभाऱ्यामध्ये चौकोनी सहा देवळी आहेत या भिंती चुन्याने रंगवलेल्या आहेत,तसेच सभामंडपात दगडी कोरीव शिल्प आहे.मंदिराचा सभामंडप हा वीस फूट लांब व 20 फूट रुंद आहे.मंदिराचे बांधकाम हे दगडी आहे.सभामंडपामध्ये सुंदर असे कासव आहे.मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिराचा प्रवेश द्वार हा दगडी आहे.प्रवेशद्वारावर सुंदर असे दगडी कोरीव काम केले आहे.मंदिराचे शिखर हे श्री महालक्ष्मी मंदिरावरील शिखराचा सारखेच दिसायला आहे.
सध्या हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे असून गणेश जयंती,गणेश चतुर्थी व संकष्टी चतुर्थी व दर मंगळवारी भाविक मोठ्या प्रमाणामध्ये येथे येत असतात.