कोल्हापूर शहराच्या पूर्वेस दक्षिणोत्तर वाहणाऱ्या जयंती ओढ्याच्या पश्चिम किनाऱ्यावर सिद्धिविनायक मंदिर आहे. मुळात हे मंदिर कोल्हापूरच्या छत्रपतींचे संस्थानच्या सेवेत असलेले ज्योतिषी बाळ जोशीराव यांनी ते बांधल्याची व तेथे गणपतीची प्रतिष्ठापना केल्याची इतिहासात नोंद आहे.  श्री सिद्धिविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे.सध्या हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली आहे.

आपले instagram Account आजच फाँलो करा व कोल्हापूरची माहिती जाणून घ्या.

मंदिराची रचना हे मंदिर मुख्य रस्त्यापासून काहीसे खालच्या बाजूला आहे.मंदिराच्या मुख्य मंडपात जाण्यासाठी पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो.उमा टॉकीजच्या दरम्यान कोल्हापूर शहरातील अतिशय मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे.मंदिर पूर्वाभिमुख असून,मुख्य गाभारा सहा बाय सहा चौरस फुटांचा आहे,तर प्रवेशद्वार तीन फुटी आहे. चौथऱ्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.मुख्य गाभाऱ्याच्या सभोवताली प्रदक्षिणा मार्ग आहे.मंदिर परिसरात राधाकृष्ण, हनुमान आणि महादेव यांचीही मंदिरे आहेत. मंदिराच्या भव्य आवारात मोठे वृक्ष असल्याने भाविकांना गारवा जाणवतो.मूळ मंदिर आहे तसे ठेवून मंदिर नव्याने बांधण्यात आली आहे.

ज्या मंदिराला एकही खांब नाही असे बिनखांबी गणेश मंदिराची माहिती

गाभाऱ्यात असलेली बैठी मूर्ती शेंदरी रंगाने रंगवलेली आहे. मूर्ती चतुर्भुज असून, उजव्या हातात परशू व त्रिशुल तर डाव्या हातात अंकुश आणि मोदक आहे. मस्तकावर पाच फण्यांच्या शेषनागाची छाया आहे. पंचतत्त्वाचे प्रतीक म्हणूक पाच फण्यांच्या नागाची फण ओळखली जाते. ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या एका बाजूला बालगणेशाची मूर्ती आहे, जी वरदविनायकाचे प्रतीक मानले जाते.श्री सिद्धिविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे.सध्या हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली आहे

महालक्ष्मी मंदिरातील साक्षी गणपतीची माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top