कोल्हापूर – मलकापूर महामार्गावर बांबवडे या गावापासुन अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर सरूड हे गाव आहे.गावाच्या वेशीपासुन कडवी नदी वाहते.पुर्वी देवीचे मंदिर कौलारू होते.आता ग्रामस्थांच्या वतीने नविन मंदिराची उभारनी केली आहे.
मंदिरात श्री निनाई देवीची मुर्ती अष्टभुज असुन मुर्तीच्या मागे सिंह आहे.तर जोर्तिलिंग अर्थात जोतिबाची घोड्यावर बसलेली मुर्ती आहे.नवरात्रात मंदिराच्या बाहेर सासनकाठीचे पुजन होते व नवरात्रात उत्सवावेळी सासनकाठी नाचवल्या जातात.मंदिराच्या बाहेर अनेक विरगळ व सतीशिळा आहेत.शारदिय नवरात्रात अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.